ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

“हे चौकीदारांचे गाव आहे, चोरांना येण्यास मनाई आहे” वाराणसीत पोस्टर्स वार

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 08, 2019 02:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30

“हे चौकीदारांचे गाव आहे, चोरांना येण्यास मनाई आहे” वाराणसीत पोस्टर्स वार

शहर : varanasi

लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी विविध पक्षांकडून पोस्टर्स आणि फलक लावण्यात येतात. मात्र, निवडणुकांच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दत्तक घेतलेल्या वाराणसीतील ककरहिया गावातील एक पोस्टर्स चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरले आहे. हे चौकीदारांचे गाव आहे, चोरांना येण्यास मनाई आहे असा मजकूर त्या पोस्टर्सवर आहे. या गावातील गावकर्‍यांनीच हे पोस्टर्स लावले आहेत. पंतप्रधानांनी हे गाव दत्तक घेतल्यानंतर या गावाचा विकास झाल्याने त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी हे पोस्टर्स लावल्याचे गावकर्‍यांनी सांगितले.
या निवडणुकीत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी काँग्रेसने ‘चौकीदार चोर है’ असा नारा दिला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने ‘मैं भी चौकीदार’ मोहीम सुरू केली. या मोहिमेत सहभागी होत ककरहिया गावातील नागरिकांनू गावात ठिकठिकाणी पोस्टर लावले आहे. सांसद आदर्श ग्राम योजनेतंर्गत पंतप्रधान मोदी यांनी ककरहिया गाव 23 ऑक्टोबर 2017 मध्ये दत्तक घेतले होते. पंतप्रधानांनी हे गाव दत्तक घेतल्यावर गावाचा विकास झाला. पंतप्रधान मोदी यांनी खासदार निधीतून गावात रस्ते बांधले. गावात वीज आणि पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला. त्यांनी गावाचा मोठ्या प्रमाणात विकास केल्याने त्यांना पाठिंबा देण्यासाठी हे चौकीदारांचे गाव आहे, चोरांना येण्यास मनाई आहे असा मजकूर असलेले पोस्टर्स लावल्याचे गावकर्‍यांनी सांगितले.

मागे

नरेंद्र मोदी म्हणजे औरंगजेबाचा आधुनिक अवतार- संजय निरुपम
नरेंद्र मोदी म्हणजे औरंगजेबाचा आधुनिक अवतार- संजय निरुपम

संजय निरुपम हे मंगळवारी वाराणसीत  बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य....

अधिक वाचा

पुढे  

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुर्योधन नाही तर जल्लाद आहेत-राबडी देवी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुर्योधन नाही तर जल्लाद आहेत-राबडी देवी

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार खडा....

Read more