ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना 'ईडी'ची नोटीस

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 01, 2019 03:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना 'ईडी'ची नोटीस

शहर : मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवारांचे विश्वासू सहकारी प्रफुल्ल पटेल यांना शनिवारी सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आली. येत्या जूनला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दीपक तलवार प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांना ही नोटीस बजावण्यात आल्याचे समजते.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिहार जेलमधील एका व्यक्तीमुळे राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची झोप उडाल्याचे वक्तव्य केले होते. त्यांनी यावेळी संबंधित नेत्याचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख प्रफुल्ल पटेल यांच्या दिशेने असल्याची चर्चा होती. अखेर ही शक्यता खरी ठरली असून शनिवारी 'ईडी'कून पटेल यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी दीपक तलवार नावाच्या दिल्लीतील कुप्रसिद्ध कॉर्पोरेटर लॉबिस्टचे दुबईतून प्रत्यार्पण करण्यात आले होते. प्रफुल्ल पटेल केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री असताना दीपक तलवार सातत्याने त्यांच्या संपर्कात होता. या काळात दीपक तलवार याने परदेशी हवाई कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम केले होते. यामुळे एअर इंडिया कंपनीचे मोठे नुकसान झाले होते. याशिवाय, अन्य एका प्रकरणात 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉसिबिलिटी'साठी राखून ठेवण्यात आलेले ९० कोटी रुपये हडप केल्याचा आरोपही दीपकवर आहे. या सगळ्याचा सध्या 'ईडी'कडून तपास सुरु आहे. यूपीए सरकारच्या काळातही हवाई क्षेत्रासंदर्भात झालेल्या व्यवहारांमध्येही दीपक तलवारची भूमिका असल्याचा संशय 'ईडी'ला आहे. याप्रकरणी दीपकवर भ्रष्टाचार आणि कर चुकवेगिरीच्या आरोपांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

        

मागे

बेरोजगारी उच्चांकावर, GDP नीचांकावर; मोदी सरकार सत्ताधीश होताच डाटा जाहीर
बेरोजगारी उच्चांकावर, GDP नीचांकावर; मोदी सरकार सत्ताधीश होताच डाटा जाहीर

२०१७-१८ या वित्त वर्षात भारताचा बेरोजगारीचा दर वाढून ६.१ टक्के झाला आहे. हा द....

अधिक वाचा

पुढे  

बिहारमध्ये नितीश कुमारांचा मंत्रिमंडळ विस्तार
बिहारमध्ये नितीश कुमारांचा मंत्रिमंडळ विस्तार

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात अपेक्षित वाटा न मिळाल्यामुळे नाराज झाल्याची ....

Read more