ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राबड़ी देवींचा निवडणूक आयोगावर आरोप,स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षा व्यवस्थेवरून केले प्रश्नचिन्ह उपस्थित

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 21, 2019 02:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राबड़ी देवींचा निवडणूक आयोगावर  आरोप,स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षा व्यवस्थेवरून केले प्रश्नचिन्ह उपस्थित

शहर : देश

लोकसभा निवडणुकीचा निकाल दोन दिवसांवर आला असताना विरोधीपक्ष नेत्यांकडून ईव्हीएम मशीनबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहे. बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबड़ी देवी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवरून त्यांनी देशभरातील स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षा व्यवस्थेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विशेष म्हणजे याआधी सुद्धा विरोधकांनी निवडणूक आयोग आणि ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली होती.

देशभरातील स्ट्रॉंग रूमच्या परिसरात ईव्हीएम मशीन सापडत आहेत. ट्रक आणि खाजगी वाहनात ईव्हीएम मशीन पकडल्या जात आहे. त्या ईव्हीएम मशीन कुठून येत आहे, कोठे जात आहे? त्या कोणासाठी नेल्या जात आहे ? हा पूर्वनियोजित प्रक्रियेचा भाग आहे का? ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर निवडणूक आयोगाने त्वरित द्यावे असे राबड़ी देवी म्हणाल्या. सीबीआय आणि ईडीप्रमाणे निवडणूक आयोगाने भाजपबरोबर युती केली असून लाज नसल्याप्रमाणे त्यांच्यासाठी काम करत असल्याचा गंभीर आरोप राबड़ी देवींनी लावला आहे.

तेजस्वी यादव यांना निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे मतदान करता आले नसल्याचा आरोप सुद्धा यावेळी राबड़ी देवींनी लावला. मतदाना यादीत तेजस्वी यांच्या जागी दुसऱ्याच व्यक्तीचे फोटो लावण्यात आले होते. याबाबत निवडणूक आयोगाने दोषींवर काय कारवाई केली, हा कुणाचा कट होता याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने द्यावे अशी मागणी राबड़ी देवींनी केली.

माझी मुलगी रोहिणी मतदानाच्या एक दिवस अगोदर सिंगापुर येथून पटन्यात आली. मात्र मतदान यादीत तिचे नाव वगळण्यात आले होते. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आणि भाजपा कार्यकर्त्यांनी सांगावे की मतदान यादीतून नाव कसे हटविण्यात आले? असे राबड़ी देवी म्हणाल्या.

मागे

सत्ताधारी-विरोधकांच्या बैठकांना ठाकरे-पवारांची गैरहजेरी ?
सत्ताधारी-विरोधकांच्या बैठकांना ठाकरे-पवारांची गैरहजेरी ?

एक्झिट पोल (EXIT POLL) जाहीर झाल्यानंतर दिल्लीतल्या राजकीय हालचालींना वेग आलाय. ए....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईतील 'या' उमेदवाराचा विजय पक्का; २००० किलो मिठाईची ऑर्डर
मुंबईतील 'या' उमेदवाराचा विजय पक्का; २००० किलो मिठाईची ऑर्डर

एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर उत्तर मुंबईतील भाजपचे उमेदवार गोप....

Read more