ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमच्या वाटेवर, काँग्रेसला धक्का

By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 08, 2019 02:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमच्या वाटेवर, काँग्रेसला धक्का

शहर : मुंबई

लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनकडून मिळाली आहे. पुत्र डॉ. सुजय विखेपाठोपाठ राधाकृष्ण विखे-पाटील देखील भाजपची वाट धरणार असल्याने काँग्रेसचे धाबे दणाणले आहेत. नगरमध्ये होणाऱ्या भाजप-शिवसेना, महायुतीच्या सभेमध्ये ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह काही आमदारही भाजपमध्ये प्रवेश घेणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याही नावाचा समावेश करण्यात आला आहे. परंतु नगरमध्ये आपण सुजय विखेविरोधात म्हणजेच भाजपविरोधात प्रचार करणार नाही हे विखे यांनी आधीच स्पष्ट केले आहे. आता ते स्वत:च भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या शक्यता असल्याने नगरमधील समिकरणं बदलणार असून भाजपला मोठे बळ मिळणार आहे.
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि विखे घराण्यात नगरच्या जागेवरून धुसफूस चालू होती. नगरमधील दिग्गज नेत्यांपैकी एक असलेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नगरच्या जागेसाठी हट्ट लावून धरला होता, परंतु दुसऱ्यांच्या पोरांचे लाड मी कसे पुरवू असे म्हणत पवारांनी ही जागा सोडण्यास नकार दिला. यानंतर डॉ. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि लोकसभेची उमेदवारी मिळवली. नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे यांच्यात मुख्य लढत होणार आहे.
दरम्यान, राधाकृष्ण विखे यांच्यासह काही आमदारही भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर, अब्दुल सत्तार हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसपुढे मोठे आव्हान असणार आहे.

मागे

अमित शाह यांची गडचिरोली-चंद्रपूरमधली सभा शेवटच्या क्षणी रद्द
अमित शाह यांची गडचिरोली-चंद्रपूरमधली सभा शेवटच्या क्षणी रद्द

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच....

अधिक वाचा

पुढे  

भास्कर विचारेंना जीवे मारण्याची धमकी
भास्कर विचारेंना जीवे मारण्याची धमकी

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ईशान्य मुंबईतील राजकारण आता चांगलेच त....

Read more