ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राहुल गांधींकडून पंतप्रधान मोदी आणि स्मृती इराणींचं अभिनंदन

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 23, 2019 07:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राहुल गांधींकडून पंतप्रधान मोदी आणि स्मृती इराणींचं अभिनंदन

शहर : देश

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचं अभिनंदन केलं. जनता मालक आहे. त्यांच्या निर्णय मान्य़ आहे. आमची लढाई विचारांशी होती. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांना मला विश्वास द्यायचा आहे की, आपल्या विचारधारेला आपल्याला जिंकवायचं आहे. काँग्रेसच्या विचारांना मानणारे देशात अनेक लोकं आहे. मी स्मृती इराणी यांचं देखील अभिनंदन करतो. त्यांनी अमेठीच्या जनतेचा प्रेमाने सांभाळ करावा. जनतेने त्यांना निवडलं आहे.माझ्यावर कितीही टीका केली. माझ्याबद्दल कितीही वाईट शब्द बोलले गेले तरी मी त्यांना प्रेमाने उत्तर देईल. मी माध्यमांचे देखील अभिनंदन केलं.लोकसभा निवडणुकीत भाजपल्या मिळालेल्या बहुमतानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत पहिली प्रतिक्रिया दिली. देशातील जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या बाजुने निकाल दिला आहे. २०१४ च्या तुलनेत २०१९ च्या निवडणुकीत भाजपला अधिक यश मिळताना दिसत आहे.

        

मागे

Election Result 2019 : राहुल गांधी वायनाडमधून विक्रमी मतांनी विजयी
Election Result 2019 : राहुल गांधी वायनाडमधून विक्रमी मतांनी विजयी

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशातील अमेठीमधून पराभवाचा....

अधिक वाचा

पुढे  

अजब-गजब : ११०७ करोडोंच्या संपत्तीच्या मालकाला केवळ ११०७ मतं
अजब-गजब : ११०७ करोडोंच्या संपत्तीच्या मालकाला केवळ ११०७ मतं

लोकसभा निवडणूक २०१९ निकाल आता जवळपास स्पष्ट झालेत. या निकालांत भाजपा देशात....

Read more