ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

काँग्रेस नेत्यांचा फॉर्म्युला राहुल गांधींनी फेटाळला

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 30, 2019 01:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30

काँग्रेस नेत्यांचा फॉर्म्युला राहुल गांधींनी फेटाळला

शहर : देश

महाराष्ट्र, हरयाणासह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदी राहावे, हा काँग्रेस नेत्यांचा फॉर्म्युला स्वत: राहुल गांधी यांना अमान्य केल्याचे दिसत असून, ते राजीनाम्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. एवढेच नव्हे, तर राहुल गांधी यांनी पक्षाच्या नेत्यांचे फोन घेणेही आता बंद केले आहे.

पक्षाच्या २५ २७ मे रोजी झालेल्या बैठकांनंतर राहुल गांधी पक्षाच्या नेत्यांना भेटही दिलेली नाही. काही नेते काल, मंगळवारी त्यांना भेटण्यास त्यांच्या निवास्थानी गेले होते, पण त्यांना टाळून राहुल गांधी आपल्या होंडा कारमधून निघून गेले. बाहेर जाताना त्यांनी आपल्या सुरक्षा रक्षकांनाही कळविले नव्हते. नंतर ते प्रियांका गांधी यांच्या लोधी इस्टेटभागातील घरी दिसले. नेत्यांशी बोलण्यास, भेटण्यास राहुल गांधी यांनी नकार दिला असल्याने प्रियांका गांधीच नेत्यांशी चर्चा करीत आहेत.

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीची बित्तंबातमी माध्यमांना मिळाल्याने ते संतापले आहेत. निवडणूक प्रचार जोरात सुरू असताना ज्योतिरादित्य सिंदिया लंडनला गेल्याबद्दल राहुल यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली होती. काही नेत्यांनी आपल्या मुलांच्या उमेदवारीसाठी कसा आग्रह धरला, याचा उल्लेख त्यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत केला होता. बैठकीतील काही भागच एका वृत्तवाहिनीने प्रसारित केला होता. त्यामुळे ती फित काँग्रेस नेत्याकडूनच गेली, अशी राहुल गांधी यांची खात्री आहे.

हंगामी अध्यक्षपदासाठी गुलाम नबी आझाद, . के. अँथनी यांची नावे पुढे येत आहेत. मात्र मल्लिकार्जुन खरगे यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड होण्याची शक्यता अधिक असल्याचे समजते. मोतिलाल व्होरा शीला दीक्षित ही नावेही घेतली जात आहेत. पण त्यांना पक्षाची सूत्रे सोपवली जातील का, ही शंका आहे.

कार्यकर्त्यांचे धरणे

राहुल गांधी यांनीच पक्षाध्यक्षपदी राहावे, यासाठी काँग्रेसचे 0 कार्यकर्ते आज त्यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे धरून बसले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊ पोलीस ठाण्यात नेले. त्यांना सोडून देण्यात आल्यावर ते कार्यकर्ते पुन्हा राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर धरणे धरून बसले.

 

मागे

जगनमोहन रेड्डींच्या शपथविधीवर अस्मानी संकट; कार्यक्रमस्थळ उद्ध्वस्त
जगनमोहन रेड्डींच्या शपथविधीवर अस्मानी संकट; कार्यक्रमस्थळ उद्ध्वस्त

आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. यामुळे पक्ष ....

अधिक वाचा

पुढे  

मोदींचे मंत्रिमंडळ ठरले मंत्रिमंडळात 'या' नेत्यांना स्थान
मोदींचे मंत्रिमंडळ ठरले मंत्रिमंडळात 'या' नेत्यांना स्थान

लोकसभा निवडणुकीतील भव्यदिव्य विजयानंतर गुरुवारी संध्याकाळी दिल्लीत मोदी ....

Read more