ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एका महिन्यात विरोधी पक्षांच्या १० नेत्यांवर छापे

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 11, 2019 06:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एका महिन्यात विरोधी पक्षांच्या १० नेत्यांवर छापे

शहर : मुंबई

निवडणुकीच्या तोंडावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे विशेष कार्यकारी अधिकारी, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तिकर विभागाचे छापे पडल्याने विरोधकांनी भाजप सरकारवर राजकीय षडयंत्राचा आरोप केलाय. तर, एका महिन्यात विरोधी पक्षांच्या १० नेत्यांवर छापे टाकण्यात आले असूनचंद्रपूरमधील काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकरांवर बुधवारी छापे पडले आहेत. गेल्या महिन्याभरात विरोधी पक्षांचे जवळपास १० नेते, त्यांचे निकटवर्तीय तर सहा महिन्यांत १५ नेते किंवा त्यांच्या निकटवर्तीयांवर छापे पडले आहेत. तर, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सहकारी, विशेष कार्यकारी अधिकारी यांच्यावर अलिकडेच प्राप्तीकर विभागाचे छापे पडले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे निकटवर्तीय व लघु पाटबंधारे मंत्री पुट्टाराजू यांच्यावरही कारवाई झाली होती. या मंत्र्यांकडे कुमारस्वामी यांच्या पुत्राच्या निवडणुकीची जबाबदारी आहे. कुमारस्वामी यांचे बंधू व बांधकाममंत्री रेवण्णा यांच्या दोन सहकाऱ्यांवरही छापे पडले होते. आंध्र प्रदेशात तिरुमला तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष आणि तेलुगू देशमचे उमेदवार पुट्टा सुधाकर यादव, तेलुगू देशम नेते  सी. एम. रमेश, तामिळनाडूत द्रमुकचे खजिनदार आमदार दुराई मुरुगन यांच्याकडून चालविल्या जाणाऱ्या संस्था, आपचे नेते कल्याण गेहलोत आणि नरेश बलियानमायावती यांचे निकटवर्तीय आणि निवृत्त सनदी अधिकारी नेटराम यांच्यावरही अशी कारवाई झाली. उत्तराखंडमधील भाजपशी निकटच्या एकावर छापे टाकण्यात आले होते. मात्र, भाजपने या कार्यकर्त्यांशी काहीही संबंध नाही, असे स्पष्ट करीत हात झटकले होते.

मागे

उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात महायुतीचा चित्ररथाचा प्रचार  जोरात
उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात महायुतीचा चित्ररथाचा प्रचार  जोरात

उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात महायुतीचा चित्ररथाचा प्रचार जोरात सुरू आह....

अधिक वाचा

पुढे  

एनडीए सरकार आल्यावर रामदास आठवलेंना दिलं मंत्रीपदाचं आश्वासन
एनडीए सरकार आल्यावर रामदास आठवलेंना दिलं मंत्रीपदाचं आश्वासन

एनडीए सरकार आल्यावर मला मंत्रीपद तसेच महाराष्ट्रात मंत्रीपद आणि महामंडळ द....

Read more