ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबई, पुणे, नाशिककडे राज यांचे लक्ष्य

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 23, 2019 11:06 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबई, पुणे, नाशिककडे राज यांचे लक्ष्य

शहर : मुंबई

राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाने राज्यभर भाजपच्या विरोधात तयार केलेल्या वातावरणामुळे राज्यात विरोधी पक्ष नेमका कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या ठिकाणी आम्हाला मतं चांगली मिळाली होती, आमचे आमदार होते, त्या ठिकाणीच आम्ही सभा घेतल्या आहेत, असे मनसेकडून सांगितले जात असले, तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुंबई, पुणे, नाशिक या पट्ट्यात राज यांनी लक्ष्य केंद्रित केल्याचे स्पष्ट आहे.

आत्तापर्यंत त्यांनी राज्यात सभा घेतल्या असून, चार सभा उद्यापासून सुरू होणार आहेत. २०१४मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची तारीफ करणाºया राज ठाकरे यांनी अचानक मोदी अमित शहा यांच्याविरोधी भूमिका घेत, राज्यात विरोधी वातावरण तयार केले आहे. क्लिप दाखवून भाजपचा फोलपणा समोर आणत आहेत. एकही उमेदवार उभा करता राज्यभर चर्चेत राहण्यात ते यशस्वी झाले असून, विधानसभेसाठी राष्ट्रवादीने मनसेला सोबत घेतल्यास आश्चर्य वाटू नये, असे राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले.

मागे

भारतीय संविधानावरच घालायचा आहे भाजपला घाला- शरद पवार
भारतीय संविधानावरच घालायचा आहे भाजपला घाला- शरद पवार

मोदी सरकारने देशाच्या न्यायपालिकेवर, सीबीआयसारख्या स्वायत्त संस्थांवर, र....

अधिक वाचा

पुढे  

लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यासाठी मतदानास सुरळीत सुरुवात
लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यासाठी मतदानास सुरळीत सुरुवात

लोकसभा निवडणूकीच्या तिसर्‍या टप्प्याच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. आज स....

Read more