ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राज ठाकरेंची स्टँडअप कॉमेडी मतदानानंतरही सुरू राहावी,जनतेची करमणूक होईल - विनोद तावडे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 24, 2019 01:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राज ठाकरेंची स्टँडअप कॉमेडी मतदानानंतरही सुरू राहावी,जनतेची करमणूक होईल  - विनोद तावडे

शहर : मुंबई

मनसे अध्यक्ष राज यांच्या मुंबईतील सभेची शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी पुन्हा एकदा खिल्ली उडवली आहे. राज ठाकरेंची स्टँडअप कॉमेडी निवडणुकांनंतरही अशीच चालू राहावी, असे म्हणत त्यांनी राज यांना टोला लगावला. तसेच, राज ठाकरेंनी काळा चौक येथील सभेत दाखवलेल्या कुटुंबाच्या जाहिरातीसंदर्भात बोलताना, शासनाचा किंवा भाजपाचा त्याच्याशी संबंध नसल्याचे म्हटले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आश्वासनांची पोलखोल करणाऱ्या सभांचा धडाका लावला आहे. मुंबईतील काळाचौकी परिसरात असलेल्या शहीद भगतसिंग मैदानात राज ठाकरे यांनी सभा घेतली. या सभेतही राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले. उद्योगपती मुकेश अंबानी आणि उदय कोटक यांनी काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना मतदान करण्याचे आवाहन करणे म्हणजेच मोदींची सत्ता जात आहे.  मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, असाच संदेश आहे. आजपर्यंत एखाद्या उद्योगपतीने जाहीरपणे कोण्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केल्याचे मला तरी आठवत नाही, असेही राज ठाकरे  यांनी सांगितले. त्यावर विनोद तावडेंनी उत्तर दिले आहे. राज ठाकरे हे म्हणणं म्हणजे पवारसाहेबांच बोट धरुन पुढे येणं आहे. या देशाचा पंतप्रधान कोण होणार हे मुकेश अंबानी ठरवत नसून, देशातील सर्वसामान्य जनता ठरवत असल्याचे तावडे यांनी म्हटले.

राज ठाकरेंनी सभेत बोलवलेल्या कुटुंबाबद्दल बोलतानाही तावडेंनी याचा सरकारशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले. कुणीतही मोदीप्रेमाने हे पेज सुरू केलं असून त्याचा सरकारशी आणि भाजपाशी संबंध नाही. तसेच या फोटोवर हे लाभार्थी असे कुठेही लिहिलं नाही. कुणतरी तो फोटो काढून मोदी हे तो मुमकीन है.. असे लिहित त्या कुटुंबाचा फोटो जोडला. अर्थात, त्या कुटुंबाच्या परवानगीशिवाय तो फोटो प्रसिद्ध करणे चुकीचे असल्याचेही तावडेंनी म्हटले. तसेच, राज ठाकरेंची ही स्टँडअप कॉमेडी, टुरुंग टॉकीज राज्यातील मतदानानंतरही असंच सुरू राहू द्या, त्यामुळे 23 तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेची करमणूक होईल, असेही तावडे यांनी म्हटले आहे. 

 

मागे

लोकसभा निवडणुक : तिसऱ्या टप्प्यात राज्यात १४ मतदारसंघांत ६१ टक्के मतदान
लोकसभा निवडणुक : तिसऱ्या टप्प्यात राज्यात १४ मतदारसंघांत ६१ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील १४ मतदारसंघांत मंगळवारी स....

अधिक वाचा

पुढे  

दिल्लीत भाजपाला हादरा, उमेदवारी न मिळाल्याने विद्यमान खासदार काँग्रेसमध्ये...
दिल्लीत भाजपाला हादरा, उमेदवारी न मिळाल्याने विद्यमान खासदार काँग्रेसमध्ये...

भाजपाने दिल्लीतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून गायक हंसराज यांना उमेदवारी द....

Read more