ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राज ठाकरेंच्या भेटीसाठी संघाचे स्वयंसेवक ‘कृष्णकुंज’वर, कारण काय?

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: फेब्रुवारी 14, 2021 02:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राज ठाकरेंच्या भेटीसाठी संघाचे स्वयंसेवक ‘कृष्णकुंज’वर, कारण काय?

शहर : मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांनी भेट घेतली. राज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज निवासस्थानी ही भेट झाली. अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी निधी संकलन करण्यासाठी ही भेट घेण्यात आली. यावेळी राज ठाकरेंनी आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन दिलं. (RSS volunteers meet MNS Chief Raj Thackeray at Krishnakunj)

उत्तर प्रदेशातील अयोध्येत श्री राम जन्मभूमि येथे भगवान रामाचे भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. या मंदिरासाठी देशभरातून निधी संकलनाचे काम सध्या सुरु आहे. या निधी संकलनाच्या अनुषंगानेच आज रा. स्व. संघाच्या काही सदस्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

निधी संकलनासाठी संघाचे सदस्य ‘कृष्णकुंजवर

याबाबत बोलताना आरएसएसचे सदस्य विठ्ठल कांबळे म्हणाले की, राम मंदिराच्या निर्माणासाठी सध्या देशभरातून निधी संकलनाचे काम सुरु आहे. ही मोहीम 27 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहील. या मोहिमेच्या अनुषंगाने राज ठाकरे यांची आम्ही भेट घेतली. यावेळी श्याम अग्रवाल, सुरेश बगेरिया, देवकिनंदन जिंदल उपस्थित होते. राम मंदिराच्या उभारणीसाठी मदत आवश्यक आहे. ही मदत आम्ही करु, असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले आहे.

राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार

राज ठाकरे 1 ते 9 मार्च या कालावधीत अयोध्येला (Ayodhya) जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली होती. त्यानंतर आपण अयोध्या दौऱ्याचा मानस व्यक्त केला आहे, मात्र तारीख अद्याप ठरलेली नाही, असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

मनसे आमदाराकडून धनादेश

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी 2 लाख 51 हजार रुपयांचा धनादेश काही दिवसांपूर्वी मदत म्हणून दिला. राजू पाटील यांनी स्वत: आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत माहिती दिली होती. राम मंदिर उभारण्याच्या या पवित्र कार्यात खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य प्राप्त झाल्याच्या भावना राजू पाटील यांनी व्यक्त केल्या होत्या. (RSS volunteers meet MNS Chief Raj Thackeray at Krishnakunj)

राम मंदिरासाठी अनेकांकडून देणग्या

राम मंदिर उभारणीसाठी अनेक दिग्गजांनी देणग्या दिल्या आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पाच लाखाचा धनादेश दिला होता. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर निर्माण करण्यासाठी 1 लाख 11 हजार रुपयांचा चेक दिलेला आहे. तर, भाजप खासदार आणि क्रिकेटपटू गौतम गंभीर यांच्याकडून राम मंदिरासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे.

मागे

लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच होते, शरद पवारांचा गंभीर आरोप
लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच होते, शरद पवारांचा गंभीर आरोप

प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच होते, अस....

अधिक वाचा

पुढे  

मुक्ताईनगरच्या मैदानात शिवसेनेचे चंद्रकांत पाटील vs राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे?
मुक्ताईनगरच्या मैदानात शिवसेनेचे चंद्रकांत पाटील vs राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे?

राष्ट्रवादीने तुमचं केलेलं नुकसान पुढील विधानसभेला व्याजासकट भरुन काढू, अ....

Read more