ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का? निवडणुकीआधीच मशाल चिन्हही जाणार; कुणी केला सर्वात मोठा दावा?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 19, 2024 12:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30

उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का? निवडणुकीआधीच मशाल चिन्हही जाणार; कुणी केला सर्वात मोठा दावा?

शहर : देश

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे निवडणूक चिन्ह 'मशाल' अडचणीत आले आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल चिन्ह दिले असून त्यावर आता एका राजकीय पक्षाने दावा केला आहे. आपले मशाल चिन्ह परत मिळावे अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाला केली असून त्यासाठी सर्व कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात नुकताच विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटालाच खरी शिवसेना अशी मान्यता मिळाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे गटाने घेतला आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने याचिका दाखल आहे. त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे. यातच आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार आहे. उद्धव ठाकरे गटाकडे असलेल्या मशाल निवडणूक चिन्हावर एका पक्षाने दावा केला आहे.

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी उभी फूट पाडून पक्ष बळकवल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाने एकनाथ शिंदे यांचा गट हाच खरी शिवसेना हे स्पष्ट झाल्याने ठाकरे यांना मोठा हादरा बसला आहे. निवडणूक आयोगाने आधीच शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्याने शिवसेनेवर मोठे संकट असतानाच आता उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल या निवडणूक चिन्हावर समता पार्टीने दावा केला आहे. त्यामुळे शिवसेना गटाला येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकात मशाल चिन्हावर निवडणूक लढविण्यात अडचणी येणार असल्याचे म्हटले जात आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या शिवसेना आमदार अपात्रता निकालानंतर ठाकरे गटाकडे आता मशाल चिन्हावरच निवडणूक लढविण्याचे लक्ष्य होते. मात्र समता पार्टीनेमशालहे निवडणूक चिन्ह आमच्या पक्षांचे असून आमची एक राष्ट्रीय पार्टी आहे. बिहार मणिपूर आणि इतर ठिकाणी निवडणुकीत आम्ही मशाल चिन्हावरच निवडणूक लढलो आहोत. आता लोकसभा निवडणुकांआधी निवडणूक आयोगाने सर्वच राष्ट्रीय पक्षांना चिन्हासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास सांगितले आहे. आणि त्यासाठी लागणारे कागदपत्रे आम्ही निवडणूक आयोगाकडे जमा केली असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आम्ही आमच्यामशालचिन्हाचा दावा करणार असल्याचे समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी कल्याणमध्ये पत्रकार परिषद घेऊन म्हटले आहे.

अन्यथा सुप्रीम कोर्टात जाऊ

शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर खरी शिवसेना कोणाची ? हा वाद सुरू झाला. त्या वेळेस ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने तात्पुरतेमशालचिन्ह दिले होते. आमच्या दाव्यानंतर सुप्रीम कोर्टाने ते चिन्ह ठाकरेंकडे ठेवण्यात यावे असे आदेश दिले. मात्र आता खरी शिवसेना शिंदे गटाची असल्याचा निर्णय झाला आहे. यामुळे आमचे चिन्ह निवडणूक आयोगाने का ? अडकून ठेवले आहे. अंधेरी निवडणुकीसाठी आमचे चिन्ह भाडेतत्त्वावर ठाकरेंना देण्यात आले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पार्टीला निवडणूक आयोग चिन्ह देतात आणि त्यासाठी लागणारे सर्व दस्तावेज आम्ही निवडणूक आयोगाकडे जमा केलेला आहे आणि समता पार्टी या चिन्हासाठी सक्षम आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आम्ही आमचे उमेदवार प्रत्येक राज्यात देणार असून यासाठीमशालचिन्हाचा दावा निवडणूक आयोगाकडे करणार आहे. आमचे दस्ताऐवज पूर्ण आहेत. त्यामुळे मशाल चिन्ह आम्हालाच त्यांना द्यावे लागेल आणि नाही दिले तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार असे समता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी म्हटले आहे.

मागे

 ‘धारावीची लोकसंख्या 2.5 लाख, मग 4 लाख लोक अपात्र कसे काय?’ किरीट सोमय्यांचा सवाल
‘धारावीची लोकसंख्या 2.5 लाख, मग 4 लाख लोक अपात्र कसे काय?’ किरीट सोमय्यांचा सवाल

"रवींद्र वायकर प्रकरणात हिशोब द्यावा लागेल. महापालिकेने परवानगी दिली. इकब....

अधिक वाचा

पुढे  

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, रोहित पवार यांना ईडीचं समन्स
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, रोहित पवार यांना ईडीचं समन्स

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्....

Read more