ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Election results 2019 : पंतप्रधान मोदींच्या अदभूत यशाबाबत लालकृष्ण अडवाणींची पहिली प्रतिक्रिया

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 23, 2019 05:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Election results 2019 : पंतप्रधान मोदींच्या अदभूत यशाबाबत लालकृष्ण अडवाणींची पहिली प्रतिक्रिया

शहर : देश

लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती येण्यास दणक्यात सुरुवात होताच सर्व स्तरांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. त्यांच्या याच यशाबद्दल भाजपामधील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यंनीही आपल्या पक्षाच्या या घवघवीत यशाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपला या अभुतपूर्व यशाच्या वाटेवर नेणाऱ्या मोदींना त्यांनी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.

'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार त्यांनी पक्षाच्या म्हणजेच भाजपाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या अमित शाह आणि पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या परिश्रमांची दाद दिली आहे. त्यांच्या समर्पक वृत्तीचीही प्रशंसा केली आहे. भाजपचा मुख्य उद्देश आणि त्यांचा मूळ हेतू प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवल्याबद्दल त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

भारतासारख्या एका मोठ्या आणि तितक्याच वैविध्यपूर्ण देशात निवडणूक प्रक्रिया इतक्या सुरळीतपणे आणि यशस्वीरित्या पार पाडणं ही भावनाच अतिशय सुरेख असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. इतकच नव्हे तर, त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांपासून ते या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या यंत्रणांच्या कामालाही दाद दिली. देशाच्या पुढील उज्वल भविष्यासाठी आशावादी दृष्टीकोन व्यक्त करत अडवाणी यांनी आपल्या सदिच्छा दिल्या.

लोकसभा निवडणुकांचे यंदाचे निकाल हे भाजपची साऱ्या देशात असणारी हवा प्रतित करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा या साऱ्यात फायदा झाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. तर, याच लोकप्रियतेच्या बळावर भाजप आणि घटर पक्षांचा आघाडीसाठीता बहुमताचा आकडा ३५० जागांपासून अवघं काही पावलं दूर आहे. त्यामुळे एकंदरच काँग्रेसला देशात सत्ता टिकवून ठेवण्यात सपशेल अपयश आल्याचं स्पष्ट होत आहे अशीच प्रतिक्रिया तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

 

मागे

Election results 2019 : रडीचा डाव खेळण्यात मला रस नाही- उर्मिला मातोंडकर
Election results 2019 : रडीचा डाव खेळण्यात मला रस नाही- उर्मिला मातोंडकर

अभिनयाकडून राजकारणाच्या वर्तुळाकडे वळलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ....

अधिक वाचा

पुढे  

यशाबाबत लालकृष्ण अडवाणींची पहिली प्रतिक्रिया 'काँग्रेसला एखाद्या अमित शाहांची गरज' - मेहबूबा मुफ्ती
यशाबाबत लालकृष्ण अडवाणींची पहिली प्रतिक्रिया 'काँग्रेसला एखाद्या अमित शाहांची गरज' - मेहबूबा मुफ्ती

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये सत्ताधारी एनडीएला भरघोस यश मिळाले आहे. आतापर्यंत मत....

Read more