ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लोकसभा २०१९ : शिवसैनिकांच्या मनात घालमेल

By GARJA ADMIN | प्रकाशित: मार्च 30, 2019 05:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30

लोकसभा २०१९ : शिवसैनिकांच्या मनात घालमेल

शहर : मुंबई

शिवसैनिकांच्या तीव्र रोषामुळे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून किरीट सोमय्या यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी "मातोश्री'ने कठोर धोरण अवलंबले असले तरी काही दिवसांपासून शिवसेना-भाजप युतीत आजवर "मोठा भाऊ' असलेल्या शिवसेनेचा "रिमोट कंट्रोल' जणू हरवला असल्याची भावना शिवसैनिकांमध्ये आहे.

आजवर युतीतील प्रत्येक "आणीबाणी'च्या वेळी भाजपला "मातोश्री'च्या नाकदुऱ्या काढाव्या लागत असे. मात्र राजकीय पटलावरील बदललेल्या परिस्थितीत युतीतील बैठका-भेटीगाठींचे सत्र मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या "वर्षा'वरच सुरू आहे. त्यातच युतीतील खडाखडीच्या काळात ज्या भाजप अध्यक्ष अमित शहा यांना अफझलखानाची उपमा दिली, त्यांचाच उमेदवारी अर्ज भरतेवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुजरातला गेले. या बदलत्या "उद्धव' नीतीमुळे पक्षाला युतीत यापुढे कायम लहान भावाची भूमिका घ्यावी लागणार का, या चिंतेमुळे सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनात घालमेल सुरू आहे.

मागे

पहिल्या लोकसभेचे मतदार आताही मतदान करण्यासाठी तेवढेच उत्सुक
पहिल्या लोकसभेचे मतदार आताही मतदान करण्यासाठी तेवढेच उत्सुक

स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभेचे मतदान १७ एप्रिल १९५२ ला झाले होते. त्य....

अधिक वाचा

पुढे  

भाजपला राम मंदिराच्या मुद्द्यावरुन‘बालाकोट’चा विसर
भाजपला राम मंदिराच्या मुद्द्यावरुन‘बालाकोट’चा विसर

पुलवामा हल्ल्यात ४० जवानांना प्राण गमवावे लागल्यानंतर त्या प्रत्येकाच्या....

Read more