ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाशिवआघाडीचे नेते राज्यपालांना भेटणार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 16, 2019 10:31 AM 2019-02-12T14:15:30+5:30

महाशिवआघाडीचे नेते राज्यपालांना भेटणार

शहर : मुंबई

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आज दुपारी साडे वाजता राज्यपालांची भेट घेणार आहेत. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी या भेटीत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. मात्र मदतीबाबत अजून ठोस पावलं उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीवर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी या भेटीत करण्यात येणार आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे सरकारी कामकाज जवळपास बंदच आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी या मागणीसाठी ही भेट असणार आहे. अवकाळी पावसाचा फटका राज्यातील सर्वच भागातील शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांना अजूनही कोणतीही मदत मिळू शकलेली नाही. नुकसानीचे पंचनामे ही अजून पूर्ण झालेले नाही. त्यामुळे मदत मिळणार की नाही याची चिंता शेतकऱ्याला आहे. हातची आलेली पीकं तर गेलीच पण नवीन पिकांची लागवड करण्यात ही उशीर झाला आहे. महाशिवआघाडीने अजूनही सत्तास्थापनेचा दावा केला नसला तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या तिनही पक्षाचे नेते एकत्र राज्यपालांची भेट घेणार आहेत.

 

मागे

'नवनिर्वाचित आमदारांना वेतन अथवा सुविधा देऊ नका'
'नवनिर्वाचित आमदारांना वेतन अथवा सुविधा देऊ नका'

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्या पक्षाला दिलेल्या वेळात सत्तास्....

अधिक वाचा

पुढे  

आमच्या विचाराचं उद्दिष्ट साफ आहे - नितीन गडकरी
आमच्या विचाराचं उद्दिष्ट साफ आहे - नितीन गडकरी

‘आमच्या विचाराचं उद्दिष्ट साफ आहे, ते उद्दिष्ट सरकार आणणं किंवा कुठल्या व....

Read more