ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मला अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा- सोनिया गांधी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 24, 2020 02:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मला अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा- सोनिया गांधी

शहर : देश

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी अपेक्षेप्रमाणे पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. आज काँग्रेसच्या कार्यकारिणीची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीच्या सुरुवातीलाच सोनिया गांधी यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी म्हटले की, पक्षाध्यक्षपदाच्या स्थित्यंतरासाठी प्रक्रिया सुरु करावी. जेणेकरून  मला अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होता येईल, असे सोनिया गांधी यांनी म्हटल्याचे समजते.

काँग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहलेले पत्र नुकतेच समोर आले होते. या पत्रात त्यांनी काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्त्वाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत भविष्यात पक्षाला अधिक सक्रिय नेतृत्त्वाची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, साधारण १५ दिवसांपूर्वी हे पत्र सोनिया गांधी यांना पाठवण्यात आले होते. यामध्ये काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. तसेच आगामी काळात पक्षाची वाटचाल कशी असावी, यासाठी पर्यायही सुचवण्यात आले होते. पक्षाला प्रभावी आणि पूर्णवेळ नेतृत्त्व मिळावे, असेही सांगण्यात आले आहे. हे नेतृत्त्व लोकांच्या नजरेत राहणारे आणि प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारे असावे. भविष्यात पक्षाने एकसंधपणे वाटचाल करण्यासाठी संस्थात्मक नेतृत्त्व अत्यंत महत्त्वाचे असल्याचे या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता राहुल गांधी यांनीही अध्यक्षपद स्वीकारायला नकार दिल्यास काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती विराजमान होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

 

मागे

काँग्रेस पक्षाच्या कार्यकारणीची आज बैठक, धुरा कोणाच्या हातात? काँग्रेस नेत्यांचं मत काय?
काँग्रेस पक्षाच्या कार्यकारणीची आज बैठक, धुरा कोणाच्या हातात? काँग्रेस नेत्यांचं मत काय?

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी या त्यांच्या पदाचा राजीमाना दे....

अधिक वाचा

पुढे  

सोनिया गांधी आजारी असताना 'ते' पत्र आले; राहुल गांधी काँग्रेस नेत्यांवर नाराज
सोनिया गांधी आजारी असताना 'ते' पत्र आले; राहुल गांधी काँग्रेस नेत्यांवर नाराज

काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पाठवलेल्या पत्रासंदर....

Read more