ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

या तारखेला शपथविधी.. पण सेनेला मुख्यमंत्रिपद न देण्यावर भाजप ठाम

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 30, 2019 06:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30

या तारखेला शपथविधी.. पण सेनेला मुख्यमंत्रिपद न देण्यावर भाजप ठाम

शहर : मुंबई

मुख्यमंत्रिपदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असताना येत्या 3 नोव्हेंबरनंतर नव्या सरकारचा शपथविधी होणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे. भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाऐवजी उपमुख्यमंत्रिपद देऊ केले आहे. याशिवाय 16 मंत्रिपदेही देण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे. त्यात अर्थ, कृषी आणि गृहराज्यमंत्री पदाचा समावेश आहे. मात्र, मुख्यमंत्रिपद देण्यावर भाजप ठाम असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.

काय म्हणाले गिरीश महाजन?

विशेष म्हणजे शपथविधी एकट्या भाजपचा होणार नाही तर शिवसेना-भाजपचा सोबत होईल, असे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा करुनच तोडगा काढतील, असेही महाजन यांनी सांगितले आहे. सत्तासंघर्षासाठी वेळ लागत नाही. 2-3 दिवसांत तिन्ही नेते एकत्र बसतील त्यानंतर निर्णय होईल. नंतर महायुतीचे सरकार स्थापन होईल, असे महाजन यांनी सांगितले. महाराष्ट्रातील जनतेने युतीला स्पष्ट बहुमत दिले आहे. शिवसेना-भाजप मिळून आम्ही सरकार स्थापन करु, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.

आमच्याकडे 17-18 अपक्ष आहेत. त्यांच्याकडे  5 अपक्ष आहेत. आम्ही कुठलीही अपक्षांची भिक मागत नाहीत. हे राजकारण असल्याचे महाजन यांनी सांगितले. दरम्यान, पुढील पाच वर्षे आपणच मुख्यमंत्री असू, शिवसेनेसोबत मुख्यमंत्रिपदावरुन कोणताही ठराव झाला नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. यावरून शिवसेना-भाजपमध्ये तणाव आणखी वाढला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वादानंतर सेना-भाजपची कालची बैठक रद्द झाली. शिवाय शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांचा जुना व्हिडीओ शेअर करुन, ठरलेल्या फॉर्म्युल्याची आठवण करुन देण्यात आली आहे.

'जे ठरलंय तेवढंच मिळणार, जास्त मागणी करू नका'

भाजपाध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये ठरलेल्या सत्ता स्थापनेच्या फॉर्म्युलानुसारच वाटप होईल असं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी स्पष्ट केलं. तसंच जे ठरलंय ते भाजप नक्की देईल पण शिवसेनेनं त्याच्यापेक्षा जास्तची मागणी करू नये असा टोलाही दानवेंनी लगावला.

 

 

मागे

देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानत म्हटले…
देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानत म्हटले…

विधीमंडळ नेतेपदी निवड झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्ष प्रमुख ....

अधिक वाचा

पुढे  

राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षनेतेपदी अजित पवार
राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षनेतेपदी अजित पवार

विधीमंडळ पक्षाचा नेता म्हणून अजित पवार यांच्या नावावर राष्ट्रवादी काँग्र....

Read more