ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

विधानपरिषद उपसभापती पदाची आज निवडणूक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 20, 2019 12:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30

विधानपरिषद उपसभापती पदाची आज निवडणूक

शहर : मुंबई

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या विधानपरिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक आज होणार आहे. हे पद शिवसेनेला दिले जाणार असून नीलम गोऱ्हे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. युतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात असल्याने त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. सभापती रामराजे निंबाळकर हे आज उपसभापती पदाच्या निवडणुकीची घोषणा करतील आणि कामकाज संपेपर्यंत या निवणुकीचे सोपस्कार पार पाडले जातील.

दरम्यान, विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वड्डेटीवार यांचे नाव लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. कारण विधानसभेतील विरोधीपक्षनेते पद काँग्रेसला हवे असेल तर विधानपरिषदेतील उपसभापतीपदाची निवडणूक जाहीर करावी, अशी अट मुख्यमंत्री यांनी काँग्रेसला टाकल्याची चर्चा याआधीच सुरु होती.

 

मागे

विखे-पाटील, क्षीरसागर, महातेकर यांची मंत्रीपदे धोक्यात?
विखे-पाटील, क्षीरसागर, महातेकर यांची मंत्रीपदे धोक्यात?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार जोर....

अधिक वाचा

पुढे  

कर्नाटक काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त
कर्नाटक काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त

वाढत्या अंतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक काँग्रेसची कार्यकारि....

Read more