ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मतदान यंत्रांच्या स्ट्राँगरूमचे दोन पोलीस निलंबित...

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 18, 2019 03:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मतदान यंत्रांच्या स्ट्राँगरूमचे दोन पोलीस निलंबित...

शहर : मुंबई

राहाता येथे मतदान यंत्रे ठेवलेल्या स्ट्राँगरूमच्या ठिकाणी बंदोबस्तास असलेले दोन पोलीस मद्याच्या नशेत असल्याचे आढळून आल्याची घटना घडलीय. त्यामूळे नशेत असलेल्या पोलिसांना निलबिंत  करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी ही कारवाई केली. साहेबराव कोरडे, बाबासाहेब शिरसाठ अशी  निलंबित कर्मचाऱ्यांची नावे असून त्यांची नेमणूक नगर  पोलीस मुख्यालय येथे होती.

राहाता येथे निवडणूक मतदान यंत्राच्या स्ट्रॉंग रूमवर बंदोबस्ताची ड्यूटी पोलिसांना देण्यात आली होती. १२ एप्रिलच्या मध्यरात्री शिर्डीचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी तपासणी केली असता बंदोबस्तासाठी तैनात केलेले दोन कर्मचारी दारूच्या नशेत आढळून आले. त्यामुळे याबाबतचा अहवाल त्यांनी  जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवला.  जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी या दोनही पोलीस कर्मचाऱ्यांना निवडणूक कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून तडकाफडकी निलंबित केले आहे. निवडणूक काळात सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य व्यवस्थित न बजावल्यास कारवाईचा इशारा देण्यात आलाय.

 

मागे

तटकरेंनी जे केले ते अनिल गिते करू शकत नाही; मुख्यमंत्र्यांची टीका
तटकरेंनी जे केले ते अनिल गिते करू शकत नाही; मुख्यमंत्र्यांची टीका

लोकसभा निवडणूकीच्या प्रचार जोरात चालू असताना रायगड मतदारसंघाचे शिवसेनेचे....

अधिक वाचा

पुढे  

भाजपचे प्रवक्ते नरसिंह राव यांच्यावर भर पत्रकार परिषदेत बूटफेक
भाजपचे प्रवक्ते नरसिंह राव यांच्यावर भर पत्रकार परिषदेत बूटफेक

लोकसभा निवडणूक प्रचारातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळं वातावरण तापलेलं अ....

Read more