ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मोदींकडून उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन, सहकार्याचे आश्वासन

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 28, 2019 02:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मोदींकडून उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन, सहकार्याचे आश्वासन

शहर : मुंबई

शिवसेनेचे भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करुन स्वत: अभिनंदन केले आहे. तसेच त्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली. दरम्यान, उद्धव यांनीही मोदी यांना फोनवरुन मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे. त्याआधी मोदी यांनी माझ्या मोठ्या भावाला मी मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला बोलावणार असल्याचे म्हटले होते.

शिवसेना - भाजप युती तुटल्यानंतर महिन्याभराच्या सत्तासंघर्षानंतर अखेर राज्यात सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या महाराष्ट्र विकासआघाडीचे नेते म्हणून ते आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. संध्याकाळी वाजून ४० मिनिटांनी शिवतीर्थावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे, काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. जवळपास २४ वर्षांनंतर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे २९ वे मुख्यमंत्री असतील.

महाराष्ट्र हा नेहमीच देशाला दिशा दाखवत आला आहे. नवे सरकार हे पाच वर्षांचा कार्यकाळ चांगल्या पद्धतीने पूर्ण करेल. आजचा दिवस हा महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक दिवस आहे, असे मत राऊत यांनी व्यक्त केले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनू नये यासाठी सर्व पर्याय वापरले गेले. परंतु आता हे सरकार स्थापन होणार आहे. हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

        

मागे

उद्धव ठाकरे  सायंकाळी 6.40 वाजता मुख्यमंत्रीपदाची का शपथ घेतील
उद्धव ठाकरे सायंकाळी 6.40 वाजता मुख्यमंत्रीपदाची का शपथ घेतील

शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आज सायंकाळी 6.40 वाजता महाराष्ट्राच्या मुख्यम....

अधिक वाचा

पुढे  

शपथविधीआधी सुप्रिया सुळेंचं भावनिक ट्विट
शपथविधीआधी सुप्रिया सुळेंचं भावनिक ट्विट

उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शिवाजी पार्कवर संध्याका....

Read more