ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आगामी विधानसभा निवडणूक ही राज ठाकरेंना सुवर्णसंधी - प्रकाश आंबेडकर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 04, 2019 02:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आगामी विधानसभा निवडणूक ही राज ठाकरेंना सुवर्णसंधी - प्रकाश आंबेडकर

शहर : मुंबई

आगामी विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाकमबॅक करण्यासाठी सुवर्णसंधी असेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले. राज ठाकरे यांनी ही संधी साधली नाही, तर अशी संधी त्यांना कधीही मिळणार नाही, असा सल्लाही यावेळी आंबेडकर यांनी दिला.

लोकसभा निवडणुकीत अकोला मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी आंबेडकर यांनी जिल्हा परिषदेसह विविध राजकीय मुद्द्यांवर बातमीदारांशी चर्चा केली. आपला मुद्दा अधिक स्पष्ट करताना आंबेडकर म्हणाले, की आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे.त्यानुसार शिवसेना १३५ आणि भाजपाचे मित्र पक्ष १५३ जागांवर लढणार आहेत. लोकसभा निवडणुकी शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले असले, तरी शिवसेनाकोमा आहे. शिवसेना आणि मनसे यांना मतदान करणाऱ्यांची मानसिकता सारखी असल्यामुळे ज्या जागांवर शिवसेनेचे उमेदवार लढणार नाहीत, त्या जागांवर मनसे आपली ताकद पणाला लावून शिवसेनेची मतेकॅश करू शकतात. मनसेला पुनरागमन करण्यासाठी ही शेवटची सुवर्णसंधी ठरेल, असे आंबेडकर म्हणाले.

 

मागे

अखेर राधाकृष्ण विखे पाटलांचा आमदारकीचाही राजीनामा
अखेर राधाकृष्ण विखे पाटलांचा आमदारकीचाही राजीनामा

काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर आज आमदारक....

अधिक वाचा

पुढे  

शपथविधीत शरद पवार यांना खरंच पाचव्या रांगेत स्थान ?
शपथविधीत शरद पवार यांना खरंच पाचव्या रांगेत स्थान ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रीमंडळाचा शपथविधी 30 मेच्या संध्या....

Read more