ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'हे' चित्र आयुष्यभर लढण्याची, संघर्ष करण्याची प्रेरणा देत राहील : सुप्रिया सुळे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 24, 2019 12:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'हे' चित्र आयुष्यभर लढण्याची, संघर्ष करण्याची प्रेरणा देत राहील : सुप्रिया सुळे

शहर : मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर माध्यमांवर समोर येऊन बोलणे टाळले. असं असलं तरी त्या व्हॉट्सअॅप स्टेटसमधून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांची मनधरणी करण्यात अपयश आल्यानंतर आता सुप्रिया सुळेंनी नवं व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवलं आहे. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा साताऱ्यातील सभेचा पावसात भिजतानाचा फोटो ठेवला आहे. या फोटोवर हे चित्र आयुष्यभर लढण्याची, संघर्ष करण्याची प्रेरणा देत राहील, असं म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या संबंधित फोटोसह म्हटले आहे, “लोकांच्या सेवेसाठी आम्ही पुन्हा एक मजबूत टीम बांधू. आमच्याकडे सर्वोत्तम आदर्श आहे. आम्ही प्रामाणिकपणा, सन्मान आणि कठोर परिश्रमाच्या बळावर पुन्हा उभे राहू.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पडझडीच्या काळात सोबत उभे राहणाऱ्यांचेही सुप्रिया सुळेंनी आभार मानले आहेत. हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस होता. या दिवसाने मला अधिक कणखर केले. या कठीण काळातही सोबत उभे राहिलेल्या प्रत्येकाचे आभार, असं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं.

सकाळी सुप्रिया सुळेंनी आणखी एक व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवलं. त्या त्या म्हणाल्या, “अखेरीस मुल्यांचाच विजय होईल. प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम कधीही वाया जात नाही. हा मार्ग कठीण असतो मात्र, त्यात शाश्वतता असते.

मागे

राष्ट्रवादीच्या आमदारांची 'घरवापसी', संख्याबळ किती?
राष्ट्रवादीच्या आमदारांची 'घरवापसी', संख्याबळ किती?

राष्ट्रवादीचे आमदार एकामागून एक परतीच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहेत. ....

अधिक वाचा

पुढे  

'राज्यपाल असंच उठून कोणालाही शपथविधीचे आमंत्रण देऊ शकत नाहीत'
'राज्यपाल असंच उठून कोणालाही शपथविधीचे आमंत्रण देऊ शकत नाहीत'

राज्यपाल असंच उठून कोणालाही शपथविधीचे आमंत्रण देऊ शकत नाहीत असे विधान न्या....

Read more