ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

काँग्रेसच्या पराभवासोबतच राजकीय गुलामी संपली - प्रकाश आंबेडकर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 27, 2019 12:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

काँग्रेसच्या पराभवासोबतच राजकीय गुलामी संपली - प्रकाश आंबेडकर

शहर : मुंबई

लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवासोबत राजकीय गुलामी ही संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीशी चर्चा करायची असेल तर ती समसमान पातळीवरच झाली पाहिजे, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शेवटच्या क्षणापर्यंत वंचित बहुजन आघाडीशी युती करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र, जागावाटपावरून ही बोलणी फिस्कटली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीला निवडणुकीत याचा मोठा फटका बसला होता.

प्रकाश आंबेडकरांनी घडवलेल्या दलित-मुस्लिम एकीने आघाडीची मते मोठ्या प्रमाणात फोडली. प्रकाश आंबेडकरांनी सर्व ४८ मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले होते. आघाडीच्या अर्ध्या डझनापेक्षा जास्त जागा पाडून प्रकाश आंबेडकरांनी आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. आता काँग्रेस-राष्ट्रवादीच नव्हे, तर भाजपा आणि शिवसेनेला त्यांची दखल घ्यावीच लागणार आहे.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही नांदेड मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीमुळे पराभवाचा धक्का बसला होता. नांदेडमध्ये भाजपाचे प्रतापराव चिखलीकर सुमारे ४० हजार मतांनी विजयी झालेत. येथे वंचित बहुजन आघाडीच्या यशपाल भिंगरे यांनी तब्बल लाख ३७ हजारांपेक्षा अधिक मते मिळवली. यानंतर अशोक चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीमुळे भाजपला फायदा झाल्याची टीकाही केली होती.

या सगळ्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित फॅक्टरकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, याची जाणीव सगळ्यांनाच झाली आहे. त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीला सामावून घेण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काय प्रयत्न करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मागे

आता राम मंदिरचं काम होणारच; मोहन भागवतांचे सूचक वक्तव्य
आता राम मंदिरचं काम होणारच; मोहन भागवतांचे सूचक वक्तव्य

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अयोध्येतील राम मंदिराविषयी मौन बाळगण....

अधिक वाचा

पुढे  

आगामी काळ पक्षासाठी कठीण असेल, पण काँग्रेस या दिव्यातून पार पडेल- सोनिया गांधी
आगामी काळ पक्षासाठी कठीण असेल, पण काँग्रेस या दिव्यातून पार पडेल- सोनिया गांधी

आगामी काळ हा काँग्रेस पक्षासाठी कठीण असेल. मात्र, या दिव्यातून काँग्रेस पक्....

Read more