ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिंदे साहेब खोके पाठवायचे तेव्हा…शिंदे गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट, ठाकरे,राऊत यांच्यावर थेट आरोप

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 12, 2024 08:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शिंदे साहेब खोके पाठवायचे तेव्हा…शिंदे गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट, ठाकरे,राऊत यांच्यावर थेट आरोप

शहर : मुंबई

शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरे यांना 1 कोटी रुपये दिल्याचा आरोप केला होता. त्यापाठोपाठ आता संजय गायकवाड यांनीही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर मोठा आरोप केलाय.

शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीय. मुख्यमंत्री फेकूचंद आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली. राऊत यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतानाच शिंदे गटाचे संजय गायकवाड यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. याआधी शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरे यांना 1 कोटी रुपये दिल्याचा आरोप केला होता. त्यापाठोपाठ आता संजय गायकवाड यांनीही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर मोठा आरोप केलाय.

संजय राऊत म्हणतात मुख्यमंत्री फेकुचंद आहेत. परंतु, सगळं राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम पाहत आहे. त्यामुळे ते फेकुचंद आहेत की ठणकचंद आहेत हे राज्याला माहित आहे. मुख्यमंत्री शिंदे हे ठणकावून काम करत आहेत. भाजपचेही आमदार म्हणतात की असे काम कधी झाले नाही. आमची चोरांची टोळी नाही तर लोकांनी लोकशाहीतून निवडून देणाऱ्या आमदारांची टोळी आहे असे आमदार गायकवाड म्हणाले.

आम्ही जनमतामधून निवडून आलेले आहोत. जेलमधून नाही. जे जेलमधून आले त्यांच्यासोबत तुम्ही जाऊन बसले. संजय राऊत याला चोरातला आणि लोकशाहीमधला फरक समजत नाही अशी टीका त्यांनी केली. मुख्यमंत्री यांच्यासोबत गुंड असल्याचे राऊत म्हणत आहेत. पण, त्या xxव्याला जेव्हा शिंदे साहेब उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते तेव्हा हे फोटो दिसले नाही का? तेव्हा शिंदे साहेब खोके पाठवायचे तेव्हा ही गुंडगिरी गोड वाटत होती का असा जळजळीत सवाल केला. तुमचे कोणाकोणासोबत संबंध आहेत हे लवकरच उघड करेन असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मुलायमसिंग सारख्या हरामखोर सोबत तुम्ही युती केली. त्याची लाज शरम राहू द्या. जे काही होते ते घरातले भांडण होते. गुंडगिरी, गँगवार म्हणता? पण, घडणारी घटना काही सांगून होते का? आरोप करताना तरी लाज ठेवा. आणखी फोटो समोर आणेन म्हणता. जे काही समोर आणायचे असेल ते आणा. एखाद्या कार्यक्रमात जातात तर कुणीही फोटो काढतो. त्याच्या कपाळावर लिहिलेले असते का कीमै चोर हु, मैं गुंडा हुं. कुणाच्या तोंडावर लिहिलेले नसते असा पलटवार आमदार गायकवाड यांनी केला.

खासदार सुप्रिया सुळे म्हणतात मी शरद पवारांची मुलगी. निश्चितच त्या त्यांच्या सुपुत्री आहेत आणि गुणवान आहेत. त्यांनी त्यांच्या नावाने पुन्हा विश्व उभे करावं. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत असा टोलाही त्यांनी लगावला. एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करून राज्यात आणखी कामे त्यांच्या हातून व्हावी यासाठी प्रत्येकजण कामाला लागला आहे असेही त्यांनी सांगितले.

मागे

राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया, काँग्रेस आमदारांचा गट घेऊन भाजपात जाणार?
राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया, काँग्रेस आमदारांचा गट घेऊन भाजपात जाणार?

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आम....

अधिक वाचा

पुढे  

मृत्यूदंडाची शिक्षा होऊनही भारतात परतले माजी नौसैनिक, मायभूमीवर पाऊल ठेवताच म्हणाले
मृत्यूदंडाची शिक्षा होऊनही भारतात परतले माजी नौसैनिक, मायभूमीवर पाऊल ठेवताच म्हणाले

कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या माजी नौसैनिकांना सोडवून आणण सोप न....

Read more