ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अन् अनाथ मुलांसाठी ‘सांताक्लॉज’ झाला विराट

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 21, 2019 04:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अन् अनाथ मुलांसाठी ‘सांताक्लॉज’ झाला विराट

शहर : देश

            अवघ्या चार दिवसांवर नाताळ सण येऊन ठेपला आहे. प्रत्येक लहान मुलांना या सणाचे आकर्षण असलेल्या सांताक्लॉजबाबत उत्कंठा असते. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा कर्णधार सांताक्लॉजच्या वेशात कोलकात्यामधील अनाथ आश्रमात पोहोचला आणि अनाथ मुलांना त्याने भेटवस्तू व खाऊचे वाटप केले. सांताक्लॉजच्या रुपात विराटला पाहून मुलांच्या चेहर्‍यावर हास्य दिसून आले.

               नाताळच्या दिवशी आपल्याला भेटवस्तू आणि आवडीचा खाऊ देणाऱ्या सांताक्लॉजची लहान मुले वाट पाहत असतात. हा आनंद अनाथ मुलांनाही अनुभवता यावा, यासाठी सांताक्लॉजच्या रुपात विराट अनाथ आश्रमात पोहोचला. विराट कोहलीचा व्हिडीओ स्टार स्पोर्ट्स या वाहिनीने शेअर केला आहे. विराट या व्हिडिओत सांताक्लॉजच्या वेशात लहान मुलांसोबत मस्ती करताना दिसून येत आहे. विराटला एका मुलाने तुझी दाढी मला खूप आवडते असे सांगितले. हे ऐकून विराटलाही हसू आवरले नाही.

मागे

आयसीसी मॅच रेफरीच्या पॅनलमध्ये समावेश हाेणारी पहिली भारतीय महिला
आयसीसी मॅच रेफरीच्या पॅनलमध्ये समावेश हाेणारी पहिली भारतीय महिला

आंध्र प्रदेशातल्या राजमुंदरीमध्ये जन्मलेल्या गंडीकाेटा सर्व लक्ष्मी म्ह....

अधिक वाचा

पुढे  

ऑस्ट्रेलिया'च्या सर्वोत्तम वन डे टीमच्या कर्णधारपदी एमएस धोनी
ऑस्ट्रेलिया'च्या सर्वोत्तम वन डे टीमच्या कर्णधारपदी एमएस धोनी

         मेलबर्न - टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या शि....

Read more