ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बोरिस बेकरचा जगण्यासाठी संघर्ष, जिंकलेले करंडक विकण्याची वेळ

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 29, 2019 07:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बोरिस बेकरचा जगण्यासाठी संघर्ष, जिंकलेले करंडक विकण्याची वेळ

शहर : मुंबई

कोर्टवर खेळताना तो कधीच डगमगला नाही, अनेक पराभव पदरी पडले पण अस्तित्व टिकवण्यासाठी त्याला कधीच झगडावं लागलं नाही. हातात रॅकेट होती तोवर खेळाने त्याला मानसन्मान दिला, पैसेही दिले. पण हातून रॅकेट गेली आणि अस्तित्वाचाच लढा सुरू झाला.

१९८५ साली टेनिस क्षितीजावर बोरिस बेकर या ताऱ्याचा उगम झाला. अवघ्या १७व्या वर्षी जर्मनीच्या या युवा टेनिसपटूने प्रतिष्ठेच्या विम्बल्डनच्या अंतिम फेरीत धडक मारली. अमेरिकेच्या केविन करेनला -, -, -, - अशी धूळ चारली आणि विक्रम नोंदवला. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी बोरिस बेकरने विम्बल्डन जिंकलं. त्यानंतर बोरिस बेकरने मागे वळून पाहिलंच नाही.

बेकरने ऑस्ट्रेलियन ओपन वेळा, विम्बल्डन वेळा, अमेरिकन ओपन वेळा जिंकलं. कोर्टवर धडाकेबाज खेळ, वेगवान अभेद्य सर्व्हिसेससाठी ओळखल्या जाणाऱ्या बोरिस बेकरला आता निवृत्तीनंतर मात्र जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. एकेकाळचा जगज्जेता आता कर्जाच्या विळख्यात अडकला आहे.

२१ जून २०१७ या दिवशी बोरिस बेकरला दिवाळखोर जाहीर करण्यात आलं. अर्बुथनॉट लॅथम या बॅकेचं बेकरवर १४ दशलक्ष डॉलर्सचं कर्ज झालं आहे. कर्जबाजारी बोरिस बेकरने जप्ती टाळण्यासाठी विविध कारणं पुढे केली. सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक या देशाचे आपण क्रीडादूत असल्याचं सांगत आपल्याला राजनैतिक अधिकार असल्याचा दावा त्याने केला. बेकरचा हा दावा त्या देशाने फेटाळल्यावर मात्र बेकरला स्वतःच्या बचावाचं कोणतंही कारण शिल्लक राहिलं नाही.

बोरिस बेकरने त्याच्या कारकिर्दीत मिळवलेले चषक, करंडक, ढाली, पदकं यांचा लिलाव होणार आहे. त्यातून त्याचं कर्ज फिटणार नाहीच पण भार मात्र थोडाफार कमी होणार आहे. बोरिस बेकरच्या या विजयी संपत्तीचा लिलाव पुढील सोमवारपासून सुरू होत आहे. बेकरने कर्ज घेतलं असल्याने त्याने ते परत करणं आवश्यकच आहे. पण गुणी टेनिसपटूवर अशी वेळ यावी यामुळे जगभरात मात्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

 

मागे

World Cup 2019 : 'पाकिस्तान नको म्हणून, भारत बांगलादेश-श्रीलंकेविरुद्ध मुद्दाम हरेल'
World Cup 2019 : 'पाकिस्तान नको म्हणून, भारत बांगलादेश-श्रीलंकेविरुद्ध मुद्दाम हरेल'

२०१९ क्रिकेट वर्ल्ड कप आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. अफगाणिस्तान....

अधिक वाचा

पुढे  

अंपायरशी हुज्जत पडली महागात, ब्रेथवेटला सुनावली ही शिक्षा
अंपायरशी हुज्जत पडली महागात, ब्रेथवेटला सुनावली ही शिक्षा

वेस्ट इंडीजचा खेळाडू कार्लोस ब्रेथवेटच्या अडचणीत वाढल्या आहेत. भारताविरु....

Read more