ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

CC World Cup 2019 : ब्रेंडन मॅकलमनं वर्तवलंय प्रत्येक सामन्याचं भाकित; केलीय डायरीत नोंद!

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 01, 2019 02:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30

CC World Cup 2019 : ब्रेंडन मॅकलमनं वर्तवलंय प्रत्येक सामन्याचं भाकित; केलीय डायरीत नोंद!

शहर : मुंबई

आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यंदाचा वर्ल्ड कप कोण उंचावणार? उपांत्य फेरीत कोणते चार संघ प्रवेश करणार? कोण असेल सर्वोत्तम खेळाडू? अशा अनेक प्रश्नांवर माजी खेळाडू आपापली मतं व्यक्त करण्यात व्यग्र आहेत. पण, न्यूझीलंडचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज ब्रेंडन मॅकलमने या माजी खेळाडूंच्या एक पाऊल पुढे टाकले आहे. त्याने वरील प्रश्नांची उकल केलीच, परंतु सोबत प्रत्येक सामन्याचे भाकितने नोंद करून ठेवले आहे.

 मॅकलमने यजमान इंग्लंडसहभारत आणि ऑस्ट्रेलिया हे अंतिम चारमध्ये प्रवेश करणारे संघ असतील, तर चौथ्या स्थानाचा फैसला हा नेट रन रेटवर होईल, असे भाकित केले आहे. चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चुरस पाहायला मिळेल, असे मॅकलमला वाटते. 37 वर्षीय मॅकलमच्या मते अफगाणिस्तान केवळ दोनच सामने जिंकण्यात यश मिळवतील आणि ते श्रीलंका बांगलादेशला नमवतील. त्यामुळे तळाच्या संघात श्रीलंका बांगलादेश यांचा समावेश असेल.न्यूझीलंडच्या या माजी कर्णधाराच्या भाकितावर ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मार्क वॉ यानेही सहमती दर्शवली आहे.

मॅकलमच्या आकडेवारीनुसार इंग्लंड 9पैकी 8 सामने जिंकेल आणि त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागेल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला इंग्लंड पराभूत करेल, तर ऑस्ट्रेलियाला तीन सामन्यात पराभव पत्करावा लागेल.

मागे

आयसीसी वर्ल्ड कप 2019  : पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा डब्बा गुल
आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा डब्बा गुल

विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला मानहानीकारक पराभव स्वीकाराव....

अधिक वाचा

पुढे  

World cup 2019 : अफलातून झेल पकडणारा 'तो' छायाचित्रकार ठरला सामनावीर
World cup 2019 : अफलातून झेल पकडणारा 'तो' छायाचित्रकार ठरला सामनावीर

इंग्लंडमध्ये सुरु असणाऱ्या क्रिकेट विश्वचषकाची रंगत दर दिवसागणिक वाढतच आ....

Read more