ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रसेलची तडाखेबाज खेळी! सामना सावरला

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 09, 2019 09:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रसेलची तडाखेबाज खेळी! सामना सावरला

शहर : chennai

सीएसकेने प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यामुळे केकेआरच्या फलंदाजीचे कंबरडेच मोडले आहे. पहिल्याच षटकात दिपक चहरने धोकादायक ख्रिस लेनला शून्यावर बाद  करून फिरकीला साथ देणार्‍या खेळपट्टीवर धोनीने दुसरेच षटक टाकण्यासाठी हरभजनकडे बॉल सोपवला. त्यानेही सुनिल नारायणला 6 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परत पाठविले. 
हरभजनचा चेंडू इतका टर्न होता होता की आता धोनी दुसर्‍या बाजूनेही स्पिनर काढणार असे वाटत होते. पण, धोनीने चहरवर विश्वास टाकला आणि नितीश राणाची शून्यावर विकेट घेतली. त्यामुळे पहिल्या तीन षटकात केकेआरचे तीन फलंदाज तंबूत होते आणि स्कोअरबोर्डवर फक्त 9 धावा लागल्या होत्या. केकेआरने चौथे षटक कसेबसे विकेट न देता घालवले. पण, आज भलत्याच रंगात आलेल्या दिपक चहरने पाचव्या षटकात रॉबिन उथप्पाला बाद करत आपली तिसरी शिकार केली. त्यानंतर कर्णधार दिनेश कार्तिक आणि शुमन गिलने केकेआरचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, ताहीरने त्या दोघांनाही पाठोपाठ बाद करत केकेआरची अवस्था 10 षटकात 6 बाद 47 अशी दयनीय केली.  
हरभजनने दिलेल्या जीवनदानाची सीएसकेला चांगलीच किंमत मोजायला लावली ती आंद्रे रसेलने. ताहीरच्या गोलंदाजीवर हरभजनने झेल सोडल्यानंतर रसेलने केकेआरला एकट्याच्या जीवावर शंभरी पार करुन दिली. त्याने 44 चेंडूत 50 धावा केल्या. त्यात 3 षटकात आणि 5 चौकारांचा समावेश होता. जरी रसेलने आधीच्या सामन्याप्रमाणे तडाखेबाज खेळी केली नसली तरी संघाने केलेल्या धावांपैकी निम्या धावा रसेलने एकट्यानेच केल्या. त्याच्यामुळेच केकेआरने 108 धावांपर्यंत मजल मारली.

मागे

चेन्नईने घेतला प्रथम गोलंदाजीचा निर्णय 
चेन्नईने घेतला प्रथम गोलंदाजीचा निर्णय 

आज चेन्नई येथे सुरू असलेल्या आयपीएलच्या सामन्यात आज पॉईंट टेबलमधील टॉपच्य....

अधिक वाचा

पुढे  

केकेआरचा दारूण पराभव
केकेआरचा दारूण पराभव

काल चेन्नई येथे झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने  केेकेआरचा दारूण ....

Read more