ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

डे-नाईट टेस्टमध्ये भारतीय बॉलरचा दणका, बांगलादेश १०६ वर ऑलआऊट

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 22, 2019 06:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30

डे-नाईट टेस्टमध्ये भारतीय बॉलरचा दणका, बांगलादेश १०६ वर ऑलआऊट

शहर : मुंबई

ऐतिहासिक अशा डे-नाईट टेस्टमध्ये भारतीय बॉलरनी दणदणीत कामगिरी केली आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या बांगलादेशचा फक्त १०६ रनवर ऑलआऊट झाला आहे. भारताकडून इशांत शर्माने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. तर उमेश यादवला आणि मोहम्मद शमीला विकेट मिळाल्या आहेत.

बांगलादेशकडून ओपनर शदमन इस्लामने सर्वाधिक २९ रन केले. लिटन दास २४ रनवर रिटायर्ड हर्ट झाला. नईम हसनला १९ रनची खेळी करता आली. बांगलादेशच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या खेळाडूला खातंही उघडता आलं नाही. कर्णधार मोमीन उल हक, मोहम्मद मिथून आणि मुशफिकुर रहीम शून्य रनवर आऊट झाले. शेवटच्या क्रमांकावर खेळलेल्या अबू जायेदलाही खातं उघडता आलं नाही.

भारत हा पहिल्यांदाच डे-नाईट टेस्ट मॅच खेळत आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानामध्ये हा सामना सुरु आहे. डे-नाईट टेस्ट मॅच असल्यामुळे नेहमीच्या लाल बॉलऐवजी गुलाबी बॉलने ही मॅच खेळवली जात आहे.

 

मागे

भारताच्या मनू भाकरणे पटकावले सुवर्णपदक
भारताच्या मनू भाकरणे पटकावले सुवर्णपदक

भारताची युवा नेमबाज मनू भाकर हिने २०१९ च्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत सुव....

अधिक वाचा

पुढे  

वेस्ट इंडीजबरोबरच्या सीरिजसाठी भारताची टीम जाहीर
वेस्ट इंडीजबरोबरच्या सीरिजसाठी भारताची टीम जाहीर

येत्या 6 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत - वेस्ट इंडीज सीरिजसाठी भारताची टी....

Read more