ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

IND VS ENG: एकाच सामन्यात जो रूटनं ठोकली 2 शतकं, भारतीय गोलंदाज बेहाल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 06, 2021 09:06 AM 2019-02-12T14:15:30+5:30

IND VS ENG: एकाच सामन्यात जो रूटनं ठोकली 2 शतकं, भारतीय गोलंदाज बेहाल

शहर : मुंबई

भारत विरुद्ध इंग्लंड आज चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. चेन्नईमध्ये हा सामना सुरू आहे. भारतीय संघासाठी हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. नाणेफेक जिंकून इंग्लंडनं पहिला फलंदाजिचा निर्णय घेतला. इंग्लंडची सुरुवात अगदी सावधपणे झाली. त्यानंतर दोन गडी बाद झाले. मग इंग्लंडच्या संघानं सामन्यात वेग धरला.

इंग्लंड संघाच्या फटकेबाजीपुढे भारतीय गोलंदाज बेहाल व्हायचे बाकी होते. मात्र भारतीय संघानं प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा कर्णधार जो रूटने शानदार फलंदाजी केली. भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व सामन्याच्या सुरूवातीलाच दिसून आले.

दुपारच्या जेवणानंतर इंग्लंडच्या जो रूट आणि सिबलीने जबरदस्त फलंदाजी करत इंग्लंडच्या संघाला मजबूती दिली. चेन्नईच्या मैदानात जो रूटने भारतीय गोलंदाजांना बेहालच केलं. प्रत्येक चेंडूवर तुफान फलंदाजी करत त्याने 164 चेडूंमध्ये शतक ठोकलं. रूटच्या कसोटी सामन्याच्या कारकीर्दीमधील हे 20वं शतक आहे.