ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारत-पाक आयसीसी वर्ल्ड कप 2019 : 48 तासांत विकली गेली सामन्याची सर्व तिकिटं

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 06, 2019 12:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भारत-पाक आयसीसी वर्ल्ड कप 2019  :  48 तासांत विकली गेली सामन्याची सर्व तिकिटं

शहर : देश

आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि पाकिस्तान या शेजारील राष्ट्रांमध्ये नेहमीच तणावाचे वातावरण राहिलेले आहे. त्याचे पडसाद क्रिकेटच्या मैदानावरही अनेकदा पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे भारत-पाक क्रिकेट सामना म्हटला की दोन्ही देशांतील चाहत्यांसाठी जणू पर्वणीच. त्यात वर्ल्ड कप संघात उभय संघ एकमेकांना भिडणार असतील तर त्याची याची देही याची डोळा अनुभव घेणे कोणाला आवडणार नाही. इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात 16 जूनला ओल्ड ट्रॅफर्डवर सामना होणार आहे. हा सामना प्रत्यक्ष पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांची झुंबड उडालेली पाहायला मिळणार आहे. अवघ्या 48 तासांत या सामन्यांची सर्व तिकिटं विकली गेल्याची माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिली आहे.

या सामन्यासाठी आयोजकांना सतत फोन येत आहेत आणि हे अधिक फोन भारतातून येत असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. याच मैदानावर 26 जूनला भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना  होणार आहे, परंतु त्यासाठी इतकी उत्सुकता कोणी दाखवलेली नाही. वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सहाही सामन्यांत भारताने बाजी मारलेली आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्येही पाकिस्तानला भारतावर विजय मिळवता आलेला नाही

भारत-पाक सामन्याला युद्ध म्हणून का बघता?; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचा सवाल

भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धींच्या लढतीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत उभय संघांमधील प्रत्येक सामना हा युद्धाप्रमाणेच असतो आणि त्याचा तणाव हा मैदानापेक्षा बाहेरच अधिक जाणवतो. 16 जूनला ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणाऱ्या सामन्यातही असेच चित्र पाहायला मिळेल, परंतु पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकनं भारत-पाक सामन्याला युद्ध म्हणून का बघता, असा सवाल केला आहे.

1947च्या फाळणीनंतर या शेजारील राष्ट्रांमध्ये नेहमीच तणाव सदृश्य परिस्थिती राहीलेली आहे. त्यामुळे क्रिकेट, हॉकी आदी खेळाच्या मैदानावरही तो तणाव पाहायला मिळतो. शोएब मलिकने दिलेल्या मुलाखतीत मात्र काही वेगळे मत व्यक्त केले. भारत-पाक सामन्याला 'युद्ध' असे संबोधणे शोएबला पसंत नाही. तो म्हणाला,'' भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये होणाऱ्या सामन्याला युद्ध असे का संबोधले जाते, हे मला कळलेले नाही. हा अत्यंत चुकीचा शब्द आहे. त्यापेक्षा 'प्रेम' हा शब्द वापरा. मग सर्वकाही सुरळीत होईल.''

मागे

''आयपीएल ही मजेशीर स्पर्धा आहे. येथे कोणीही कोणालाही हरवू शकतो''- रोहित शर्मा
''आयपीएल ही मजेशीर स्पर्धा आहे. येथे कोणीही कोणालाही हरवू शकतो''- रोहित शर्मा

आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रविवारी कोलकाता नाईट ....

अधिक वाचा

पुढे  

आयपीएल स्पर्धेस मुकणार हा खेळाडू
आयपीएल स्पर्धेस मुकणार हा खेळाडू

चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा मराठमोळा अष्टपैलू क्रिकेटपटू केदार जाधव ख....

Read more