ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

IPL 2019: धोनीचा हा “सिक्सर”, चेंडू कुठे गेला !...

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 22, 2019 12:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30

IPL 2019: धोनीचा हा “सिक्सर”, चेंडू कुठे गेला !...

शहर : bangalore

आयपीएलची खरी मजा कशात असेल तर ती 'लास्ट ओव्हर थ्रील'मध्ये. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणाऱ्या सामन्यातली 'पैसा वसूल' धम्माल काही औरच. गेल्या काही दिवसांत असे अनेक थरारक सामने क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळाले. पण, चेन्नई सुपरकिंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातला कालचा सामना पाहताना चाहत्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले नसतील तरच नवल. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीनं जे धुमशान केलं, ते लाजवाब होतंच; पण शेवटच्या ओव्हरमध्ये त्यानं खेचलेला षटकार भल्याभल्यांना चक्रावून टाकणारा होता. बेगलोरनं चेन्नईला विजयासाठी १६२ धावांचं आव्हान दिलं होतं. गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या चेन्नईसाठी ते कठीण नव्हतं. परंतु, सलामीवीर झटपट बाद झाले आणि धावगती मंदावत गेली. शेन वॉटसन, फॅफ डुप्लेसिस आणि सुरेश रैना हे त्रिकूट अपयशी ठरलं. केदार जाधव टिकतोय असं वाटत असतानाच तंबूत परतला. त्यामुळे चेन्नईची अवस्था ४ बाद २८ अशी झाली होती.

अर्थात, 'कठीण समय येता, धोनी कामास येतो', या उक्तीप्रमाणे 'कॅप्टन कूल'ने किल्ला लढवला. अंबाती रायुडूसोबत त्यानं धावफलक हलता ठेवला आणि रनरेटही वाढवला. रायुडू बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजानं धोनीला साथ दिली, पण घाईने घात केला आणि तो रन-आउट झाला. त्यानंतर सगळी सूत्रं धोनीनं आपल्या हाती घेतल्याचं पाहायला मिळालं.

शेवटच्या दोन ओव्हरमध्ये चेन्नईला ३६ धावांची गरज होती. धोनी स्ट्राईकवर होता, ड्वेन ब्राव्हो नॉन स्ट्राईकला. परंतु, धोनीनं स्वतःच आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. एकेरी धाव घेण्याची संधी असतानाही, तो धावला नाही. नवदीप सैनीच्या १९व्या ओव्हरमध्ये दहा धावा झाल्या. दोन-तीन चेंडू निर्धाव गेले. परंतु, शेवटच्या षटकात धोनीनं कसर भरून काढली. उमेश यादवच्या पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर दोन धावा, पाचव्या चेंडूवर पुन्हा षटकार अशी आतषबाजी त्यानं केली. त्यापैकी दुसऱ्या चेंडूवरचा षटकार अविस्मरणीय ठरला. १११ मीटर लांब गेलेल्या या चेंडूनं सीमारेषाच नव्हे तर स्टेडियमची रेषाही ओलांडली. यंदाच्या आयपीएलमधील हा सर्वात खणखणीत षटकार ठरला आहे.

दुर्दैवानं, धोनीची ही झुंज व्यर्थ ठरली. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी दोन धावा हव्या होत्या. धोनी मोठा फटका खेळायला गेला, पण चेंडू चुकला आणि यष्टिरक्षक पार्थिव पटेलकडे गेला. धोनी आणि शार्दुल ठाकूर एका धावेसाठी धावले खरे, पण शार्दुल धावबाद झाला आणि बेंगलोरने एका धावेनं सामना जिंकला. या सामन्यात धोनीनं ४८ चेंडूत ८४ धावांची तडाखेबंद खेळी साकारली. त्यानं चेन्नईच्या चाहत्यांना भरभरून आनंद दिला, पण त्यांचा विजयोत्सव थोडक्यात हुकला आणि बेंगलोरसाठी शेवट गोड झाला.

 

 

 

मागे

IPL 2019 : आर अश्विनने सामना गमावला, सोबत 12 लाखांचा दंडही भरावा लागला
IPL 2019 : आर अश्विनने सामना गमावला, सोबत 12 लाखांचा दंडही भरावा लागला

आयपीएल 2019 : कर्णधार श्रेयस अय्यरचे (58*) व सलामीवीर शिखर धवन (56) यांच्या दमदार अर्....

अधिक वाचा

पुढे  

IPL 2019: अजिंक्य रहाणेच्या शतकानंतरही  दिल्लीचा विजय
IPL 2019: अजिंक्य रहाणेच्या शतकानंतरही दिल्लीचा विजय

अजिंक्य रहाणेच्या शतकानंतरही राजस्थानचा दिल्लीने ६ विकेटने पराभव केला आह....

Read more