ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पंत नवीन पिढीचा सेहवाग - संजय मांजरेकर

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 10, 2019 04:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पंत नवीन पिढीचा सेहवाग - संजय मांजरेकर

शहर : मुंबई

दिल्ली कॅपिटल्स संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत चांगल्याच फॉर्मात आहे. आपल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर ऋषभने दिल्लीला अंतिम फेरीच्या जवळ आणून ठेवलं आहे. विश्वचषक संघात ऋषभ पंतला संधी मिळाली नाही, मात्र यामुळे खचून न जाता पंतने आयपीएलमध्ये मिळत असलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडली आहे. हैदराबादविरुद्ध सामन्यातही ऋषभने फटकेबाजी करत संघाला विजयाच्या जवळ आणून सोडलं होतं. भारताचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरही त्याच्या या खेळीने प्रभावित झाला आहे. आपल्या ट्विटर हँडलवर संजय मांजरेकरने ऋषभ पंतचा उल्लेख, नवीन पिढीचा विरेंद्र सेहवाग असा केला आहे.
डावखुर्‍या ऋषभ पंतने यंदाच्या हंगामात गोलंदाजांचा समाचार घेत, 15 सामन्यांमध्ये 450 धावा केल्या आहेत. अंतिम फेरी गाठण्यासाठी दिल्लीला शुक्रवारच्या सामन्यात चेन्नईविरुद्ध अशीच आक्रमक खेळी करावी लागणार आहे. त्यामुळे या महत्वाच्या सामन्यात ऋषभ पंतच्या खेळाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

मागे

दिल्लीचा हैदराबादवर रोमहर्षक विजय
दिल्लीचा हैदराबादवर रोमहर्षक विजय

163 धावांचा पाठलाग करणार्‍या दिल्ली कॅपिटल्सने 8 गडी राखून विजयी लक्ष्य ओलां....

अधिक वाचा

पुढे  

चेन्नईने नाणेफेक जिंकली, दिल्लीला फलंदाजीचे आमंत्रण
चेन्नईने नाणेफेक जिंकली, दिल्लीला फलंदाजीचे आमंत्रण

आयपीएलमध्ये इतिहास घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला दुस....

Read more