ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

IPL 2020, RR vs SRH : हैदराबादचा राजस्थानवर 8 विकेट्सने दणदणीत विजय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 23, 2020 10:59 AM 2019-02-12T14:15:30+5:30

IPL 2020, RR vs SRH : हैदराबादचा राजस्थानवर 8 विकेट्सने दणदणीत विजय

शहर : मुंबई

सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा 8 विकेट्सने दणदणीत पराभव केला आहे. राजस्थानने विजयासाठी ठेवलेल्या 155 रन्सचं आव्हान हैदराबादने 2 गड्यांच्या मोबदल्यात 18.1 ओव्हरमध्ये पूर्ण केले. मनीष पांडे आणि विजय शंकरच्या अफलातून खेळीच्या जोरावर हैदराबादने राजस्थानचा दणदणीत पराभव केला.

राजस्थानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात खराब झाली. कर्णधार डेव्हिड वॉर्नर पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट झाला. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये जोफ्रा आर्चरने जॉनी बेअरस्टोची दांडी गुल केली. यानंतर मैदानात उतरलेल्या विजय शंकरने आणि मनीष पांडेने डावाची सुत्रे आपल्या हातात घेत राजस्थानच्या बॉलर्सला चोपून काढलं.

मनीष पांडेने अवघ्या 47 बॉलमध्ये 83 रन्सची बहारदार खेळी केली. मनीष पांडेने आपल्या खेळीत 8 उत्तुंग सिक्सर खेचले तर 4 चौकारही लगावले. विजय शंकरने 51 बॉलमध्ये 52 रन्स करुन मनीष पांडेला चांगली साथ दिली. विजयने 52 रन्स करताना 6 चौकार लगावले. या दोघा बॅट्समनच्या जोरावर हैदराबादने राजस्थानवर अफलातून विजय मिळवला.

तत्पूर्वी दुबईच्या स्टेडिअमवर हैदराबादविरुद्धच्या सामन्यात राजस्थानच्या फलंदाजांनी साफ निराशा केली.  राजस्थानने प्रथम बॅटिंग करताना निर्धारित 20 ओव्हरमध्ये 06 गडी बाद 154 रन्स केल्या. राजस्थानकडून संजू सॅमसनने सर्वाधिक 36 रन्स केल्या. तर त्यापाठोपाठ बेन स्टोक्स 30, रियान पराग 20, तर स्मिथ आणि उथप्पाने प्रत्येकी 19 धावा केल्या. राजस्थानकडे बॅटिंग ऑर्डर तगडी असताना देखील मोठी धावसंख्या उभारण्यात राजस्थानला अपयश आलं. राजस्थानचे फलंदाज रन्ससाठी संघर्ष करताना दिसून आले.

हैदराबादच्या बोलर्सने राजस्थानच्या फलंदाजांना बांधून ठेवलं होतं. पहिला पॉवरप्ले वगळता राजस्थानच्या बॅट्समनना चमक दाखवता आली नाही. पहिल्या 6 ओव्हरमध्ये 47 रन्स करण्यात राजस्थानच्या बॅट्समनना यश आलं. मात्र त्यानंतर हैदराबादच्या सर्वच बोलर्सनी अचूक टप्प्यावर बॉलिंग करत राजस्थानच्या बॅट्समनना जखडून ठेवलं.

राजस्थानकडून जेसन होल्डरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. विजय शंकर आणि राशिद खानने टिच्चून बॉलिंग करत प्रत्येकी 1 विकेट्स मिळवली. विजय शंकर आणि राशिद खानने किफायती बॉलिंग करत राजल्थानच्या बॅट्समनना मोठे फटके खेळण्यापासून रोखून धरलं.

राजस्थानने आतापर्यंत 10 मॅच खेळल्या आहेत त्यामध्ये 8 गुण मिळवून राजस्थान गुणतालिकेत 6 व्या क्रमांकावर आहे. हैदराबादने आतापर्यंत 09 मॅच खेळल्या आहेत. त्यामध्ये त्यामध्ये 6 गुण मिळवून 7 व्या क्रमांवर हैदराबाद आहे.

मागे

IPL 2020, KKR vs RCB : बंगळुरुचा शानदार विजय, कोलकातावर 8 विकेट्सने मात
IPL 2020, KKR vs RCB : बंगळुरुचा शानदार विजय, कोलकातावर 8 विकेट्सने मात

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Banglore) कोलकाता नाईट रायडर्सवर (Kolkata Knight Riders) 8 विके....

अधिक वाचा

पुढे  

Kapil Dev | तुम्हा सर्वांचे आभार, कपिल देव यांचं रुग्णालयातून ट्वीट
Kapil Dev | तुम्हा सर्वांचे आभार, कपिल देव यांचं रुग्णालयातून ट्वीट

ज्येष्ठ क्रिकेटर कपिल देव यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे (Kapil Dev Tweet). त्यांन....

Read more