ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

World Cup 2019: केन विलियमसनने मोडला हिटमॅन रोहितचा रेकॉर्ड

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 21, 2019 12:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

World Cup 2019: केन विलियमसनने मोडला हिटमॅन रोहितचा रेकॉर्ड

शहर : मुंबई

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात १९ जूनला मॅच खेळण्यात आली. यामॅचमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा विकेटने पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने यंदाच्या वर्ल्डकपमधील आपली विजयी कामगिरी कायम ठेवली आहे.

केन विलियमसनने आफ्रिकेविरुद्ध १०६ रनची नॉटआऊट खेळी केली. या शतकी खेळीसोबतच केन विलियमसनने रेकॉर्डब्रेक केला. केन विलियमसनने रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला. इंग्लंडमध्ये सर्वात कमी इनिंगमध्ये हजार धावा पूर्ण करण्याचा हा रेकॉर्ड आहे.

रोहित शर्माने सर्वात कमी इनिंगमध्ये इंग्लंडमध्ये हजार रनांचा टप्पा पूर्ण केला होता. रोहित शर्माने नुकत्याच १६ जूनला पाकिस्तान विरुद्धात झालेल्या मॅचमध्ये हा रेकॉर्ड आपल्या नावे केला होता. रोहितने पाकिस्तान विरुद्ध १४० रनची शतकी कामगिरी केली होती. रोहितने १८ इनिंगमध्ये इंग्लंडमध्ये हजार धावा पूर्ण केल्या होत्या.     

केन विलियमसनने आफ्रिकाविरुद्ध १०४ रनची खेळी केली. यासोबतच त्याने हजार धावांचा टप्पा पू्र्ण केला. त्याने ही कामगिरी १७ इनिंगमध्ये पूर्ण केली. त्यामुळे केन विलियमसनने रोहितचा रेकॉर्डबेक केला आहे.

इंग्लंडमध्ये वेगवान १००० धावा पूर्ण करणारे खेळाडू

१७ इनिंग्स - केन विलियमसन

१८ इनिंग्स - रोहित शर्मा

१९ इनिंग्स - शिखर धवन

२१ इनिंग्स - विवियन रिचर्ड्स

२२ इनिंग्स - राहुल द्रविड/ मार्कस ट्रेस्कोथिक

२३ इनिंग्स - जॉनी बेयरस्टो

 

मागे

World Cup 2019: सेमीफायनलमध्ये जाऊ शकतात या ४ टीम
World Cup 2019: सेमीफायनलमध्ये जाऊ शकतात या ४ टीम

दक्षिण आफ्रिकेचा न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर आता आयसीसी वर्ल्डकप २०१९....

अधिक वाचा

पुढे  

कॉमेंट्री किंवा आयपीएल, काहीतरी एकच निवडा; लोकपालांची सचिन, सौरव आणि लक्ष्मणला तंबी
कॉमेंट्री किंवा आयपीएल, काहीतरी एकच निवडा; लोकपालांची सचिन, सौरव आणि लक्ष्मणला तंबी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) लोकपाल डीके जैन यांनी भारताचे माज....

Read more