ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला शोएब मलिकचा अलविदा,सानिया मिर्झाने केले भावनिक ट्विट !

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 06, 2019 04:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला शोएब मलिकचा अलविदा,सानिया मिर्झाने केले भावनिक ट्विट !

शहर : मुंबई

पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. पाकिस्तानचे विश्वचषक स्पर्धेतून आव्हान संपुष्टात आले आणि शोएबने निवृत्तीची घोषणा केली. ट्विटरद्वारे त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली. दरम्यान शोएब मलिक हा भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिचा पती आहे. त्याच्या निवृत्तीनंतर सानियाने भावनिक ट्विट केले आहे. प्रत्येक कथेला शेवट असतो पण आयुष्यात प्रत्येक शेवटाला एक नवीन सुरुवात होत असते, असे म्हणत शोएबबद्दल अभिमान व्यक्त केला आहे.

विश्वचषकातील शोएब मलिकच्या कामगिरीवर विशेषत: भारताविरुद्धच्या सामन्यात त्याने केलेल्या कामगिरीवर चांगलीच टीका झाली होती. मलिकने २८७ एकदिवसीय सामन्यात ३४.५५च्या सरासरीने हजार५३४ धावा केल्या आहेत. त्याने शतके आणि ४४ अर्धशतके झळकावली आहेत. तर २८७ एकदिवसीय सामन्यांमध्ये १५८ विकेट घेतल्या आहेत. त्याने १९ धावांमध्ये विकेट घेतल्या. त्याची ही सर्वोत्तम कामगिरी आहे२००७ ते २००९ या कालावधी शोएब पाकिस्तान संघाचा कर्णधार होता. १९९९ मध्ये  वेस्ट इंडिज विरुद्ध शोएबने एक दिवशीय सामन्याला सुरुवात केलीतर २००१ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सध्या सुरु असलेल्या ( २०१९ ) विश्वचषकावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्याने कसोटी क्रिकेटला २०१५ मध्ये अलिवदा केला होतागतवर्षी २०१८ला तो १०० टी-२० सामने खेळणारा तो पहिला क्रिकेटपटू होय.

सानियाचे ट्विट

प्रत्येक कथेला शेवट असतो. पण आयुष्यात प्रत्येक शेवटाला एक नवीन सुरुवात होत असते. गेली २० वर्षे अभिमानाने तू तुझ्या देशासाठी खेळल आला आहेस. तू जे काही मिळवलेस आणि आज तू जो कोणी आहेस, त्याबद्दल मला आणि इझहानला तुझा अभिमान आहे, असे सानिया हिने ट्विट केले आहे.

मागे

श्रीलंकेचा 55 धावत 4 था बळी
श्रीलंकेचा 55 धावत 4 था बळी

  विश्वचषक स्पर्धेत आज भारत विरूद्ध श्रीलंका सामना रंगला असून. श्रीलंका ....

अधिक वाचा

पुढे  

दीमुथ करुणारत्ने ठरला बूमराहच 100 वा बळी सोबत विक्रमाला गवसणी
दीमुथ करुणारत्ने ठरला बूमराहच 100 वा बळी सोबत विक्रमाला गवसणी

आजच्या भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात भारताच्या गोलंदाज जसप्रीत बूमराह य....

Read more