ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नेमबाजी वर्ल्डकप : भारताला सुवर्णपदक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 25, 2019 05:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नेमबाजी वर्ल्डकप : भारताला सुवर्णपदक

शहर : देश

नेमबाजी वर्ल्डकपमध्ये भारताकडून आज सुवर्ण कामगिरी पाहायला मिळाली. भारताच्या मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांनी 10 मी. एअर पिस्तुल प्रकारातील मिश्र दुहेरी विभागात सुवर्णपदक पटकावले.

मनू आणि सौरभ हे सध्या चांगल्या फॉर्मात आहेत. ही स्पर्धा सध्या चीनमधील बीजिंग येथे सुरु आहे. पण यापूर्वी नवी दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेतही या दोघांनी नेत्रदीपक कामगिरी केली होती. मनू आणि सौरभ यांनी यजमान चीनच्या खेळाडूंच्या जोडीला अंतिम फेरीत 16-6 असे पराभूत करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

मनू आणि सौरभ यांनी पात्रता फेरीमध्ये 482 गुण पटकावले होते. त्यामुळे मनू आणि सौरभ यांना पात्रता फेरीत पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. मनूने मिश्र दुहेरीमध्ये सुवर्णपदक पटकावले असले तरी तिला महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात चांगली कामगिरी करता आली नाही. या स्पर्धेच्या पात्रता फेरीचा अडथळाही तिला पार करता आला नव्हता. पण मिश्र दुहेरी प्रकारामध्ये मात्र मनूने सौरभबरोबर खेळताना ही कसर भरून काढली.यापूर्वी भारताच्या अंजुम मौदगिल आणि दिव्यांश सिंग पवार यांनी सुवर्णपदक पटकावले होते. भारताचे या स्पर्धेतील हे पहिले सुवर्णपदक होते. अंजुम आणि दिव्यांश या जोडीने चीनच्या लिऊ रुक्सुअन आणइ यांग हाओरन यांच्यावर अटीतटीच्या लढतीत 17-15 असा विजय मिळवला आणि सुवर्णपदक आपल्या नावावर केले.

मागे

चाहत्याने ‘मास्टर ब्लास्टर’ला वाढदिवसानिमित्त दिल्या हटके शुभेच्छा!
चाहत्याने ‘मास्टर ब्लास्टर’ला वाढदिवसानिमित्त दिल्या हटके शुभेच्छा!

सचिनचा वाढदिवस म्हणजे क्रिकेट प्रेमींसाठी, त्याच्या चाहत्यांसाठी मोठा सो....

अधिक वाचा

पुढे  

IPL 2019: सहा दिवसानंतर मुंबई पुन्हा मैदानात, चेन्नईमध्ये कसून सराव
IPL 2019: सहा दिवसानंतर मुंबई पुन्हा मैदानात, चेन्नईमध्ये कसून सराव

मोठ्या विश्रांतीनंतर मुंबईच्या टीमने पुन्हा एकदा कसून सराव करायला सुरुवा....

Read more