ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ऑस्ट्रेलियाच्या मदतीसाठी 'हा' भारतीय खेळाडू पुढे सरसावला

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 21, 2020 03:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ऑस्ट्रेलियाच्या मदतीसाठी 'हा' भारतीय खेळाडू पुढे सरसावला

शहर : विदेश

           नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियामध्ये लागलेल्या आगीत अनेक प्राण्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. निसर्गाची मोठी हानी झाली. ऑस्ट्रेलियामध्ये लागलेल्या आगीनंतर जगभरातून अनेक जण मदतीसाठी पुढे आले आहेत. अनेक आजी-माजी खेळाडूही मदतीसाठी सरसावले आहेत. या खेळांडूंमध्ये आता सचिन तेंडुलकर आणि वेस्टइंडिजच्या  कर्टनी वॉल्शचं  नावही जोडलं गेलं आहे. 

       'क्रिकेट ऑस्ट्रेलिया'ने मदतीसाठी चॅरिटी मॅच आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात रिकी पॉन्टिंग आणि शेन वॉर्न यांच्या नेतृत्वाखाली दोन संघ खेळणार आहे. या मॅचमध्ये सचिन तेंडुलकरही सहभागी होणार आहे. 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया'चे सीईओ केव्हिन रॉबर्टसन यांनी सांगितलं की, मदतीसाठी चॅरिटी सामन्याचं आयोजन करत आहोत. हा सामना रिकी पोंटिंग आणि शेन वॉर्न यांच्यात होणार आहे. या सामन्यामध्ये ऍडम गिलक्रिस्ट, ब्रेट ली, शेन वॉटसन, जस्टिन लेंगर, मायकल क्लार्क, ऍलेक्स ब्लॅकवेलदेखील खेळणार आहे. इतर खेळाडूंच्या नावाची घोषणा लवकरच करणार असल्याचं ते म्हणाले. 

 


          या सामन्यासाठी सचिन तेंडुलकर प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. रिकी पोंटिंगच्या संघाचा सचिन कोच असणार आहे. तर शेन वॉर्नच्या संघासाठी कर्टनी वॉल्श कोच आहे. रिकी पोंटिंगच्या संघाचा सचिन कोच असणार आहे. तर शेन वॉर्नच्या संघासाठी कर्टनी वॉल्श कोच आहे. 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया'च्या सीईओंनी, या चॅरिटी सामन्यामध्ये सचिन तेंडुलकर आणि कर्टनी वॉल्शही सहभागी होत असल्याचं सांगत समाधानाची भावना व्यक्त केली आहे. या दोन संघात ८ फेब्रुवारी रोजी सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यामधून मिळणारा निधी ऑस्ट्रेलियन रेड क्रॉस डिझास्टर रिलीफ ऍन्ड रिकव्हरी फंडला दान करण्यात येणार आहे. 
 

मागे

टीम इंडिया न्यूझीलंड दौर्‍यासाठी रवाना
टीम इंडिया न्यूझीलंड दौर्‍यासाठी रवाना

          नवी दिल्ली : घरच्या मैदानावर श्रीलंकेचा टी-२० मालिकेत धुव्वा उ....

अधिक वाचा

पुढे  

न्यूझीलंडवर भारताची ६ गडी राखून मात
न्यूझीलंडवर भारताची ६ गडी राखून मात

           ऑकलंड : भारत विरुद्ध न्यूझीलंड या संघामध्ये होणार्‍या पाच&nbs....

Read more