ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

World Cup 2019 : पहिल्याच मॅचमध्ये स्टोक्सचा अफलातून कॅच

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 31, 2019 05:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30

World Cup 2019 : पहिल्याच मॅचमध्ये स्टोक्सचा अफलातून कॅच

शहर : मुंबई

वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा १०४ रनने पराभव केला. या मॅचमध्ये बेन स्टोक्सने अष्टपैलू कामगिरी केली. पहिले बॅटिंग करताना स्टोक्सने ७९ बॉलमध्ये ८९ रन केले. तर नंतर बेन स्टोक्सने दक्षिण आफ्रिकेच्या २ विकेट घेतल्या. याचबरोबर स्टोक्सने दोन कॅच पकडले आणि १ रन आऊट केला.

बेन स्टोक्सने या मॅचमध्ये घेतलेल्या अफलातून कॅचने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.  इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ३१२ रनचे तगडे आव्हान दिले होते. दक्षिण आफ्रिकेची अवस्था ३४ ओव्हरनंतर १८०/६ अशी होती. ३५ व्या ओव्हरमध्ये आदिल रशीद बॉलिंग टाकायला आला. त्याच्या पहिल्याच बॉलवर अँडिले पेहलूकवायोने मिडविकेटच्या दिशेने स्वीप शॉट मारला.

यावेळी बेन स्टोक्स डिप मिडविकेट जवळ होता. स्टोक्सने उलट्या दिशेने उडी मारली आणि अशक्य वाटणारा कॅच एकहाताने पकडला. त्यामुळे बॅट्समन पेहलूकवायो देखील पाहतच राहिला. स्टोक्सच्या या अफलातून कॅचचे त्याच्या सहकाऱ्यांनी आणि मैदानातील समर्थकांनी कौतुक केले. दरम्यान आयसीसीने या कॅचचा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन शेअर केला आहे.

स्टोक्सचा विजयी स्टोक

इंग्लंडच्या विजयात मोलाचं योगदान दिल्यामुळे बेन स्टोक्सला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. इंग्लंडची या वर्ल्ड कपमधील पुढची मॅच ३ जूनला पाकिस्तानविररुद्ध होणार आहे.

मागे

World Cup 2019 : वेस्ट इंडिजच्या बॉलिंगपुढे पाकिस्तानचं लोटांगण
World Cup 2019 : वेस्ट इंडिजच्या बॉलिंगपुढे पाकिस्तानचं लोटांगण

२०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. वेस्ट इ....

अधिक वाचा

पुढे  

आयसीसी वर्ल्ड कप 2019  : पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा डब्बा गुल
आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा डब्बा गुल

विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला मानहानीकारक पराभव स्वीकाराव....

Read more