ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

World Cup 2019: जिंकणाऱ्या टीमला मिळणार एवढी रक्कम

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 31, 2019 02:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

World Cup 2019:  जिंकणाऱ्या टीमला मिळणार एवढी रक्कम

शहर : मुंबई

५० ओव्हरच्या क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे. वर्ल्ड कप जिंकणारी टीम आपलं वर्चस्व तर सिद्ध करेलच याखेरीज तो कोट्यवधीही होईल. वर्ल्ड कपमध्ये १० मिलियन डॉलर म्हणजे जवळपास ७० कोटींची बक्षीसं वाटण्यात येणार आहेत. विजेत्या टीमला २८ कोटींचं बक्षीस प्रदान करण्यात येईल. आतापर्यंतच्या वर्ल्ड कप स्पर्धांमधील हे सर्वाधिक रकमेचं बक्षीस आहे.

उपविजेत्या टीमला २० लाख डॉलरच्या बक्षीसानं गौरवण्यात येईल. उपांत्य सामन्यात पराभूत होणाऱ्या टीमला लाख डॉलर, तर प्रत्येक साखळी सामन्यातील विजेत्या टीमला ४० हजार डॉलर प्रदान करण्यात येतील. साखळी सामन्यातून आगामी फेरीत दाखल होणाऱ्या टीमला एक लाख डॉलर देण्यात येतील.यंदाचा वर्ल्ड कपमध्ये १० देश सहभागी झाले आहेत. वर्ल्ड कप हा यावेळी राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे. त्यामुळे पहिल्या फेरीत प्रत्येक टीम एकमेकांविरुद्ध खेळणार आहे. म्हणजेच पहिल्या फेरीमध्ये प्रत्येक टीम मॅच खेळेल. यानंतर टॉप- टीम सेफी फायनलमध्ये पोहोचतील. सेमी फायनल जिंकलेल्या दोन्ही टीममध्ये फायनलचा सामना रंगेल. १४ जुलैला लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर वर्ल्ड कपची फायनल खेळवली जाईल. जुलै आणि ११ जुलैला दोन सेमी फायनल होणार आहेत.

 

मागे

वर्ल्ड कप २०१९ :  पहिल्याच मॅचमध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला लोळवलं
वर्ल्ड कप २०१९ : पहिल्याच मॅचमध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला लोळवलं

वर्ल्ड कप २०१९च्या पहिल्याच मॅचमध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा अक्षरश: ध....

अधिक वाचा

पुढे  

World Cup 2019 : वेस्ट इंडिजच्या बॉलिंगपुढे पाकिस्तानचं लोटांगण
World Cup 2019 : वेस्ट इंडिजच्या बॉलिंगपुढे पाकिस्तानचं लोटांगण

२०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. वेस्ट इ....

Read more