ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

World Cup 2019 : पाकिस्तानचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, टीम इंडियात एक बदल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 16, 2019 02:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30

World Cup 2019 : पाकिस्तानचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, टीम इंडियात एक बदल

शहर : मुंबई

वर्ल्ड कपच्या सगळ्यात महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या भारत-पाकिस्तान मॅचला सुरुवात झाली आहे. या मॅचमध्ये पाकिस्तानने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने या मॅचमध्ये एक बदल केला आहे. दुखापतग्रस्त शिखर धवनऐवजी विजय शंकरला टीममध्ये संधी देण्यात आली आहे.

टॉस जिंकलो असतो तर आपणही पहिले बॉलिंगच घेतली असती, अशी प्रतिक्रिया कर्णधार विराट कोहलीने दिली आहे. आम्ही चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळत आहोत, त्यामुळे टीममध्ये बदल करण्याची गरज नाही. शिखर धवनचा बदल मात्र पर्याय नसल्यामुळे करावा लागल्याचं, विराट म्हणाला.

टीम इंडिया

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), विजय शंकर, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह

पाकिस्तानची टीम

इमाम उल हक, फकर झमान, बाबर आझम, मोहम्मद हफीज, सरफराज अहमद, शोएब मलिक, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, वहाब रियाझ, मोहम्मद आमिर

आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात मॅच झाल्या आहेत. यातल्या सगळ्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे. १९९२, १९९६, १९९९, २००३, २०११ आणि २०१५ या वर्ल्ड कपमध्ये भारत पाकिस्तान एकमेकांना भिडले होते.

मागे

IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामना रद्द झाला तर 'इतक्या' कोटींचे नुकसान
IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामना रद्द झाला तर 'इतक्या' कोटींचे नुकसान

विश्वचषक स्पर्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभ....

अधिक वाचा

पुढे  

World Cup 2019 : भारताकडून पुन्हा पाकिस्तानचा धुव्वा, २७ वर्षानंतरही रेकॉर्ड कायम
World Cup 2019 : भारताकडून पुन्हा पाकिस्तानचा धुव्वा, २७ वर्षानंतरही रेकॉर्ड कायम

वर्ल्ड कपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. भारताच्य....

Read more