ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

World Cup 2019 : शिखर धवन वर्ल्ड कपमधून बाहेर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 19, 2019 05:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

World Cup 2019 :  शिखर धवन वर्ल्ड कपमधून बाहेर

शहर : मुंबई

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. ओपनर शिखर धवन हा संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे. जूनरोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचवेळी शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. या मॅचमध्ये शिखर धवनने ११७ रनची खेळी केली होती.

शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली असली तरी टीम इंडियाने आयसीसीकडे बदली खेळाडूची मागणी केली नव्हती. धवनची दुखापत १०-१२ दिवसात बरी होईल, असा अंदाज होता. पण धवनची दुखापत बरी व्हायला आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे आता बीसीसीआय आयसीसीकडे बदली खेळाडूला परवानगी द्यावी अशी मागणी करणार आहे.

शिखर धवनऐवजी ऋषभ पंत याची टीममध्ये निवड केली जाणार आहे. शिखर धवनची दुखापत बघता याआधीच ऋषभ पंतला इंग्लंडमध्ये पर्याय म्हणऊन पाठवण्यात आलं होतं. आयसीसीची परवानगी मिळाल्यानंतर ऋषभ पंतचा टीममध्ये समावेशाचा मार्ग मोकळा होईल.

१६ जूनला पाकिस्तानविरुद्धच्या मॅचसाठी शिखर धवनऐवजी केएल राहुल ओपनिंगला आला होता. या मॅचमध्ये राहुलने ५७ रन केले होते. राहुलने रोहितसोबत १३६ रनची ओपनिंग पार्टनरशीप केली होती.

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पुढचा सामना २२ जूनरोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. या मॅचमध्ये ऋषभ पंतला संधी मिळते का हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

शिखर धवन वर्ल्ड कपमधून बाहेर होणं हा टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे. आयसीसी स्पर्धांमध्ये धवनने शतकं केली आहेत. यातली शतकं वर्ल्ड कपमधली आहेत. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये धवनची कामगिरी कायमच उल्लेखनीय राहिली आहे.

 

 

 

मागे

World Cup 2019 : राशिद खान वर्ल्ड कपमधला सगळ्यात महागडा बॉलर
World Cup 2019 : राशिद खान वर्ल्ड कपमधला सगळ्यात महागडा बॉलर

क्रिकेट विश्वामध्ये सध्या अफगाणिस्तानच्या राशिद खानची सर्वोत्तम स्पिनरप....

अधिक वाचा

पुढे  

अफगाणिस्तानची ही मागणी बीसीसीआयने फेटाळली
अफगाणिस्तानची ही मागणी बीसीसीआयने फेटाळली

अफगाणिस्तान क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआयने योगदान दिलं आहे. ....

Read more