ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

विश्वचषक नेमबाजी : अपूर्वी चंदेलाने साधला सुवर्णवेध

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 27, 2019 05:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

विश्वचषक नेमबाजी : अपूर्वी चंदेलाने साधला सुवर्णवेध

शहर : मुंबई

भारताच्या अपूर्वी चंदेला हिने सोनेरी लय कायम ठेवताना जर्मनीच्या म्युनिच येथे सुरू असलेल्या वर्षातील तिसऱ्या आयएसएसएफ रायफल पिस्तूल विश्वचषक स्पर्धेत रविवारी चुरशीच्या लढतीत महिलांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले. जयपूरच्या या नेमबाजाने अंतिम फेरीमध्ये एकूण २५१ गुण नोंदवले. तिच्या वर्चस्वापुढे चीनच्या वांग लुयाओ २०५. गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. चीनची जु होंग २२९. गुणांसह तिसºया क्रमांकावर राहिली.

अपूर्वी आणि वांग यांच्यादरम्यानची लढत खूप चुरशीची ठरली. त्यात भारतीय खेळाडू फक्त . गुणाने आघाडीवर होती. अपूर्वीने अखेरीस १०. गुणांसह सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले, तर वांग फक्त १०. गुणच मिळवू शकली. अपूर्वी हिचे वर्षातील हे दुसरे आयएसएसएफ विश्वचषकातील सुवर्णपदक ठरले. याआधी तिने फेब्रुवारी महिन्यात नवी दिल्ली येथे विश्व विक्रम रचताना पहिले स्थान पटकावले होते. बीजिंगमध्ये दुसºया विश्वचषकात ती चौथ्या स्थानावर होती. अपूर्वी हिचे कारकीर्दीतील हे चौथे आयएसएसएफ पदक आहे.

एक अन्य भारतीय इलावेनिल वलारिवान फायनलपर्यंत पोहोचली; परंतु ती दुर्दैवाने पदकापासून वंचित राहताना चौथ्या स्थानावर राहिली. ती कांस्यपदक जिंकणाºया खेळाडूच्या तुलनेत फक्त . गुणाने पिछाडीवर राहिली. पात्रता फेरीमध्ये अपूर्वी आणि इलावेनिल यांनी अंतिम फेरीत आगेकूच ठरली. अंतिम फेरीमध्ये अंजूम मोदगील ११ व्या, मनू भाकर २४ व्या आणि चिंकी यादव ९५ व्या स्थानावर राहिली. या स्पर्धेतून रोमानियाच्या लॉरा जार्जेटा कोमान हंगेरीच्या इस्टर मेसजारोस यांनी २०२० आॅलिम्पिक कोटा मिळवला.

>लॉरा इस्टर यांनी महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत अनुक्रमे पाचवे सहावे स्थान पटकावले. याआधीच भारताकडून अपूर्वी चंदेला, सौरभ तिवारी, अभिषेक वर्मा, दिव्यांशसिंग पवार यांनी आॅलिम्पिक कोटा मिळवला. सोमवारी तीन अंतिम फेºया होतील. यात आॅलिम्पिक कोटा असतील.

मागे

आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारताकडून वर्ल्डकपमध्ये पहिली सेंच्युरी कोणाची
आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारताकडून वर्ल्डकपमध्ये पहिली सेंच्युरी कोणाची

आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारत आतापर्यंत झालेल्या अकरा वर्ल्डकपमध्ये खेळला आहे. आ....

अधिक वाचा

पुढे  

दुसऱ्या सराव सामन्यात केएल राहुल आणि धोनीचं बांगलादेश विरोधात दमदार शतक
दुसऱ्या सराव सामन्यात केएल राहुल आणि धोनीचं बांगलादेश विरोधात दमदार शतक

दुसऱ्या सराव सामन्यात धोनी आणि केएल राहुलने धमाकेदार शतक ठोकलं आहे. या दोनह....

Read more