ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वर्ल्ड कप निवडीनंतर दिनेश कार्तिकची प्रतिक्रिया

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 16, 2019 02:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वर्ल्ड कप निवडीनंतर दिनेश कार्तिकची प्रतिक्रिया

शहर : देश

वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची १५ एप्रिलला घोषणा झाली. त्यामध्ये जवळजवळ काही खेळा़डूंचे स्थान निश्चितच होते. पंरतु टीममध्ये अतिरिक्त विकेटकीपर म्हणून कोणाला स्थान मिळणार यासाठी अनुभवी दिनेश कार्तिक आणि युवा ऋषभ पंतमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली. पंरतु निवड समितीने दिनेश कार्तिकला टीममध्ये स्थान दिले.'माझी निवड वर्ल्ड कप टीमसाठी झाल्याने मी आनंदी आहे. मी खूप उत्साहित आहे. मी भारतीय टीमचा गेल्या काही वर्षापासून एक भाग म्हणून खेळतोय. त्याचा मला सार्थ अभिमान वाटतोय. वर्ल्ड कपसाठी माझी निवड होणे हे माझ्यासाठी स्वप्नवतच आहे. माझे स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतयं.' असं दिनेश कार्तिक म्हणाला.

आयपीएल मधील कोलकाता टीमच्या वेबसाईट सोबत दिनेश कार्तिक बोलत होता. 'एक टीम म्हणून आम्ही काही विशेष कामगिरी केली आहे. ही विशेष कामगिरी करण्यामध्ये  माझा देखील थोडाफार हातभार लागला आहे. आपली निवड वर्ल्ड कप टीमसाठी व्हावी असे मला मनोमनी वाटतं होतं'. असे कार्तिक म्हणाला.

तब्बल १२ वर्षांनी संधी

दिनेश कार्तिकची २०१९ च्या ५० ओव्हरच्या वर्ल्ड कप टीममध्ये अंतिम १५ खेळाडूंमध्ये निवड झाली आहे. कार्तिकचे तब्बल १२ वर्षांनी वर्ल्ड कपटीमसाठी निवड झाली आहे. याआधी २००७ साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये त्याला संधी मिळाली होत. पंरतु त्याची निवड अंतिम-११ मध्ये झाल्याने त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. या वर्ल्डकप मध्ये भारतीय टीम पात्रता फेरीमधून बाहेर पडली होतीयंदाच्या वर्ल्ड कपला ३० मे पासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे.

 

मागे

ठाणे सेंटर संघाने उडवला ऑस्ट्रेलियन संघाचा धुव्वा
ठाणे सेंटर संघाने उडवला ऑस्ट्रेलियन संघाचा धुव्वा

आज प्रथमच ठाणे विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघाचा सामना रंगला. 16 वर्षांखालील गटात झ....

अधिक वाचा

पुढे  

पंजाबला पहिला धक्का
पंजाबला पहिला धक्का

पंजाब किंग्ज इलेव्हनचा कर्णधार आर. अश्विनने जयपूरमध्ये झालेल्या सामन्यात ....

Read more