By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 19, 2019 04:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई पुण्यासह कोकणात मोठ्या प्रमाणात भक्तिभावाने व उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जातो त्यासाठी मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात जातात या वर्षी दोन सप्टेंबर पासून गणेश उत्सव सुरू होत आहे तेव्हा कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने एसटी कडून 2200 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. या जादा गाड्यांचे आरक्षण 27 जुलैपासून करता येईल, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
2 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सवाच्या पहिल्या टप्प्याची जादा वाहतूक करण्यात येणार आहे या प्रवासाचे आरक्षण एकाच वेळी म्हणजे 27 जुलैपासून एक महिना आधी संगणकीय आरक्षण उपलब्ध असणार आहे तर वीस जुलैपासून ग्रुप आरक्षणाला सुरुवात होणार आहे. मुंबई आणि उपनगरातील 14 ठिकाणातून जादा गाड्या सोडण्यात येणार आहे तर परतीच्या प्रवासासाठी 7 ते 12 सप्टेंबर या कालावधीत कोकणातील स्थानिक बस स्थानकातून जादा गाड्या सोडण्याचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.
तसेच महामार्गावरील ठिकाणी वाहन दुरुस्ती पथके (ब्रेक डाऊन व्हॅन) तैनात करण्यात येणार आहेत. प्रवाशांसाठी प्रवासात तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधनगृह उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे
मुंबईसह राज्यात तीन चाकी रिक्षा आहेत. परंतु लवकरच बजाजची 'क्यूट कार' रिक्....
अधिक वाचा