ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हा अर्थ संकल्प एक हरित अर्थसंकल्प

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 06, 2019 04:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30

हा अर्थ संकल्प एक हरित अर्थसंकल्प

शहर : delhi

हा अर्थ संकल्प एक हरित अर्थसंकल्प आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पाची प्रशंसा केली आहे.या अर्थसंकल्पातून सामान्य नागरिकानसाठी सुलभ नागरी जीवन तसेच गाव आणि गरिबांचे कल्याणही होणार आहे. त्याच बरोबर पर्यावरण वाहतूक आणि सौर ऊर्जा यावर अधिक भर दिला आहे.

अर्थसंकल्पात महिला सशक्तीकरण आणि नवउद्योगांनाही  प्रोत्साहन दिले आहे. शिक्षणाच्या संदर्भात नवी शिक्षण प्रणाली कृत्रीम बुद्धीमत्ता ह्याला अधिक बळकटी दिली जाणार आहे

हा अर्थसंकल्प  प्रकल्प 2002 साली आपल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षासाठी ठरवलेल्या संकल्पांना पूर्ण करेल. गेल्या पाच वर्षात आमच्या सरकारने गरीबशेतकरी,  अनुसूचित जाती,  पीडित,  शोषित आणि वंचितांना सशक्त करण्यासाठी त्वरित पावले उचलली. पुढील पाच वर्षांमध्ये त्यांचे सक्षमीकरण देशाला विकासाचे केंद्र बनवेल.

अर्थसंकल्प वर्तमानच नाही तर भावी पिढीच्या अडचणीसुद्धा लक्षात घेतो. स्वच्छ भारत मिशन प्रमाणेच हर घर जल अभियान सुद्धा देशाला संकटातून वाचण्यासाठी मदत करेल. या अर्थसंकल्पात घेतले गेलेले निर्णय आगामी दशकांमध्ये पाया मजबूत करण्याबरोबरच नव युवकांसाठी संधींची अनेक द्वारे उघडतील

 वीजगॅसरस्तेघाणभ्रष्टाचारव्हीआयपी संस्कृतीसर्वसामान्यांची आपल्या हक्कासाठीची लढाई यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत आणि आम्हाला यश मिळत आहे आज लोकांमध्ये खूप नव्या आकांक्षा आणि खूप अपेक्षा आहेत. हा बजेट जगाला विश्वास देत आहे की  त्यांच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात त्यांना विश्वास मिळत आहे .असे म्हणून अर्थसंकल्प आणि अर्थमंत्री निर्मला यांना शुभेच्छा दिल्या .

मागे

नॅशनल ट्रान्सपोर्ट कार्ड ची घोषणा
नॅशनल ट्रान्सपोर्ट कार्ड ची घोषणा

आता बसच तिकीट, पार्किंगचा खर्च, रेल्वे तिकीट यासाठी एकाच वेळेस पैसे देता येण....

अधिक वाचा