ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Budget 2021 : अर्थमंत्र्यांकडून ‘सरकारी सेल’ची घोषणा, वाचा काय काय विकणार सरकार?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 02, 2021 07:04 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Budget 2021 : अर्थमंत्र्यांकडून ‘सरकारी सेल’ची घोषणा, वाचा काय काय विकणार सरकार?

शहर : देश

यंदाच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने आणखी काही सरकारी कंपन्यांची विक्री करण्याचा निर्णय घेतलाय. या अंतर्गत निर्गुंतवणूक करुन 2 लाख कोटी रुपये उभे करण्याची घोषणा करण्यात आलीय. सरकार आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये अनेक सरकारी कंपन्या विकून या कंपन्यांमधील आपलं भांडवलं मिळवण्यासाठी निर्गुंतवणुकीकर करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलेल्या माहितीनुसार यात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसह (BPCL) यात अनेक कंपन्यांचा समावेश आहे (Budget 2021 List of government companies which will be sale to collect revenue by Modi Government).

निर्मला सीतारमण म्हणाल्या, “पुढील आर्थिक वर्षात BPCL, एअर इंडिया, कॉनकोर आणि SCI मधील भांडवलाचं निर्गुंतवणुकीकरण करण्यात येईल. याशिवाय भारतीय विमा कंपनीचा (LIC) आयपीओ आणण्याचं पुढील वर्षी नियोजन आहे. IDBI मधील भांडवलाचं देखील निर्गुंतवणुकीकरण करण्यात येईल. तसेच शेअर बाजारातील उसळी पाहता केंद्र सरकार लवकरच काही CPSE मध्ये देखील भागिदारी देखील ऑफर फॉर सेलच्या (OFS) माध्यमातून विकेल. इतर खासगीकरणाचे व्यवहार देखील आर्थिक वर्ष 2022 पर्यंत पूर्ण केले जातील.”

आर्थिक तूट कमी करण्यासाठी सरकारनं बँकांचे खासगीकरण करण्याचा निर्णय

आर्थिक तूट कमी करण्यासाठी सरकारनं बँकांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठीच आयडीबीआय बँकेसह दोन बँकांना मोदी सरकार विकणार आहे. कोरोनामुळे महसूल घटलेला असून, खर्चसुद्धा दिवसागणिक वाढत चालला आहे. राज्यांनाही खासगी क्षेत्रातील कंपन्यांची निर्गुंतवणूक करता यावी, यासाठी केंद्रीय कोषातून एक प्रोत्साहनपूरक पॅकेज आणणार आहोत, असंही सांगितलंय.

एलआयसीचा आयपीओ येणार

एलआयसीचा लवकरच आयपीओ येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामण यांनी केलीय. त्यामुळे एलआयसीचा आयपीओ पहिल्या सहामाहीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सरकारनं मूल्यांकनासाठी एका कंपनीचीही नेमणूक केली असून, शेअर बाजारातील हा सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता आहे.

मागे

Education Budget 2021: देशातील सैनिक स्कूलची संख्या वाढणार, नवीन 100 सैनिक स्कूल कशी सुरु होणार?
Education Budget 2021: देशातील सैनिक स्कूलची संख्या वाढणार, नवीन 100 सैनिक स्कूल कशी सुरु होणार?

नव्या शैक्षणिक धोरणांच्या आधारे देशातील 15 हजार शाळांचा विकास करण्यात येणा....

अधिक वाचा

पुढे  

सरकारकडे एक रुपया कसा जमा होतो, तो नेमका कुठे खर्च होतो? समजून घ्या बजेटचा ताळेबंद सोप्या शब्दात
सरकारकडे एक रुपया कसा जमा होतो, तो नेमका कुठे खर्च होतो? समजून घ्या बजेटचा ताळेबंद सोप्या शब्दात

नुकतंच सरकारने पुढील वर्षासाठी अर्थसंकल्प मांडलाय. यात अनेक घोषणा झाल्या. ....

Read more