ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

सरकारकडे एक रुपया कसा जमा होतो, तो नेमका कुठे खर्च होतो? समजून घ्या बजेटचा ताळेबंद सोप्या शब्दात

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 02, 2021 07:08 AM 2019-02-12T14:15:30+5:30

सरकारकडे एक रुपया कसा जमा होतो, तो नेमका कुठे खर्च होतो? समजून घ्या बजेटचा ताळेबंद सोप्या शब्दात

शहर : मुंबई

नुकतंच सरकारने पुढील वर्षासाठी अर्थसंकल्प मांडलाय. यात अनेक घोषणा झाल्या. अनेक योजनांची सुरुवात करण्यात आली. वेगवेगळ्या विभागानुसार पैशांची तरतुद करण्यात आली. मात्र, अनेकांना सरकारकडे खर्च करण्यासाठी पैसे येतात कुठून आणि ते खर्च कसे होतात हाच मूळ प्रश्न पडला. हेच समजून घेण्यासाठी सरकारकडे येणारा एक रुपया आणि त्यांच्या खर्चाच्या उदाहरणातून बजेटचा हा सोपा ताळेबंद (Know all about how government get income and plan of various expenses Budget 2021).

केंद्र सरकारला खर्चाच्या आधी आपल्या उत्पन्नाचंही नियोजन करावं लागतं. त्यामुळेच आपलं उत्पन्न आणि खर्चाचा लेखाजोखा म्हणजेच अर्थसंकल्प होय. जर सरकारला उत्पन्न म्हणून 1 रुपया मिळाला, तर सरकार हा 1 रुपया वेगवेगळ्या विभागांमधील कामासाठी खर्च करते. या 1 रुपयापैकी 36 पैसे उधार आणि लायबलिटीजमधून येतात. महापालिका करातून 13 पैसे आणि आयकर 14 पैसे, सीमा शुल्क विभागामधून 3 पैसे उत्पन्न मिळते. दुसरीकडे केंद्रीय उत्पादन शुल्कातून 8 पैसे आणि वस्तू आणि सेवा करातून 15 पैसे मिळतात. इतर करातून 6 पैसे आणि कर्जातून 5 पैसे येतात. हे सर्व मिळून सरकारकडील एक रुपया तयार होतो.

पैसे नेमके कोठे खर्च होतात?

एकदा का सरकारच्या उत्पन्नाचे मार्ग आणि त्याची अंदाजित रक्कम निश्चित झाली की सरकार या उत्पन्नाच्या खर्चाचंही नियोजन करतं. याप्रमाणे सरकार आपल्या पूर्वनियोजित योजनांवर 9 पैसे, केंद्राच्या योजनांवर 13 पैसे, घेतलेल्या कर्जाचं व्याज देण्यासाठी 20 पैसे आणि संरक्षण विभागासाठी 8 पैसे देतं. याशिवाय इतर देशांची मदत करण्यासाठी 9 पैसे, इतर वाहतुकीसाठी 10 पैसे, पेन्शनसाठी 16 पैसे आणि इतर खर्चासाठी 10 पैसे दिले जातात.

मागे

Budget 2021 : अर्थमंत्र्यांकडून ‘सरकारी सेल’ची घोषणा, वाचा काय काय विकणार सरकार?
Budget 2021 : अर्थमंत्र्यांकडून ‘सरकारी सेल’ची घोषणा, वाचा काय काय विकणार सरकार?

यंदाच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने आणखी काही सरकारी कंपन्यांची विक्री कर....

अधिक वाचा

पुढे  

Budget 2021: अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्राला किती कोटी?
Budget 2021: अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्राला किती कोटी?

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये ....

Read more