ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शीवमध्ये भरारी पथकाची धडक कारवाई; 11 लाखांची रोकड जप्त

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 18, 2019 02:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शीवमध्ये भरारी पथकाची धडक कारवाई; 11 लाखांची रोकड जप्त

शहर : मुंबई

मुंबई येथील शीवमध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने 11 लाख 85 हजारांची रोकड जप्त  करण्यात आली आहे. जप्त केलेली रोकड ही बेहिशेबी असल्याचे सांगण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यानंतर काळ्या पैशांवर बारिक नजर ठेवण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. या पथकाने 10 मार्च ते आतापर्यंत राज्यभरातून तब्बल 112 कोटी रुपये काळा पैसा जप्त केला.
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काळा पैसा आणि दारूची मोठ्या प्रमाणावर ने-आण होण्याची शक्यता असते. असे कोणतेही प्रकार घडू नये म्हणून निवडणूक आयोगाने महत्वाची पावले उचलले आहे. त्यामुळे मुंबईसह देशभरात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांची काळ्या पैशांवर बारिक नजर आहे.

मागे

डी. एल. कराड यांना तडीपारीची नोटीस
डी. एल. कराड यांना तडीपारीची नोटीस

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामगार नेते तथा सीटूचे नेते डॉ. डी. एल. कराड यांन....

अधिक वाचा

पुढे  

लोकल चालवताना मोटरमनच्या डोळ्यात मिरची पूड फेकली
लोकल चालवताना मोटरमनच्या डोळ्यात मिरची पूड फेकली

मुंबईची लाईफलाईन म्हटल्या जाणाऱ्या लोकलसाठी मोटरमनचं काम मोलाचं असतं. हजा....

Read more