ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लोकल चालवताना मोटरमनच्या डोळ्यात मिरची पूड फेकली

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 18, 2019 04:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

लोकल चालवताना मोटरमनच्या डोळ्यात मिरची पूड फेकली

शहर : मुंबई

मुंबईची लाईफलाईन म्हटल्या जाणाऱ्या लोकलसाठी मोटरमनचं काम मोलाचं असतं. हजारो प्रवाशांचे जीव त्यांच्या हातात असतात. मात्र हार्बरलाईनवरील मोटरमनला अतिशय विचित्र अनुभव आला आहे. कारण कुणीतरी विकृत व्यक्तीने, मोटरमनच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. मात्र प्रसंगावधान राखल्याने, त्यांनी वेळीच ब्रेक दाबला आणि, एका मोटरमनच्या प्रसंगावधानाने हजारो प्रवाशांचे जीव वाचले आहेत. ही घटना, मध्य रेल्वेच्या हार्बरलाईनवर १३ एप्रिल २०१९ रोजी घडली.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून, हार्बरलाईनला बेलापूरसाठी निघालेली लोकल, गोवंडी स्टेशनवर थांबली. यानंतर गाडी गोवंडी स्टेशनवरून निघतानाच, लगेच कुणीतरी अज्ञाताने मोटरमनच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. गाडी स्टेशन सोडताना ही घटना घडली, मोटरमनला काहीच दिसेनासे झाले, कारण डोळ्याची आग होवू लागली. पण प्रसंगावधान राखत मोटरमन किशोर मीना यांनी वेग नियंत्रणात आणत गाडी थांबवली.या प्रकरणी रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ही अतिशय गंभीर घटना असल्याने, आम्ही आरोपीचा कसून शोध घेत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. हा आरोपी विकृत आहे, किंवा काही घातपात घडवण्याच्या उद्देश होता का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

मागे

शीवमध्ये भरारी पथकाची धडक कारवाई; 11 लाखांची रोकड जप्त
शीवमध्ये भरारी पथकाची धडक कारवाई; 11 लाखांची रोकड जप्त

मुंबई येथील शीवमध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने 11 लाख 85 हजारांची रोकड ज....

अधिक वाचा

पुढे  

आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या 5 जणांना कांदिवलीत अटक
आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या 5 जणांना कांदिवलीत अटक

देशात लोकसभा निवडणुकीसोबतच आयपीएलची जोरदार चलती पाहायला मिळत आहे. आयपीएलच....

Read more