ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भोसरी एमआयडीसीतील कागद छपाईच्या कारखान्याला आग

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 03, 2019 06:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भोसरी एमआयडीसीतील कागद छपाईच्या कारखान्याला आग

शहर : पुणे

भोसरी एमआयडीसीतील कागद छपाईच्या कारखान्याला शुक्रवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यामुळे परिसरात मोठ्याप्रमाणात धूर पसरला होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी दीड तासात आग आटोक्यात आणली. 
भोसरी एमआयडीसीतील पवना इंडस्ट्रीज येथील 21 नंबरच्या गाळयात कृष्णा प्रिंटर्स हा कागद छपाईचा कारखाना आहे. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास येथे नेहमीप्रमाणे कर्मचारी काम करीत असताना 1 वाजून 40 मिनिटांनी अचानक आग लागली. याठिकाणी मोठ्याप्रमाणात कागद असल्याने सुमारे 30 मीटर अंतरापर्यंत धूर पसरला. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, त्याठिकाणी मोठ्याप्रमाणात धूर असल्याने घटनास्थळापर्यंत पोहोचणे कठीण होते. अशातही अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करुन दीड तासात आग आटोक्यात आणली. निगडी प्राधिकरण आणि भोसरी केंद्राची प्रत्येकी एक तर संत तुकारामनगर केंद्राच्या चार अशा एकूण सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअग्निशामक अधिकारी अशोक कानडे, प्रसाद चव्हाण, नामदेव शिंगाडे यांच्यासह 30 ते 35 कर्मचार्‍यांनी आग आटोक्यात आणली.

मागे

उल्हासनगरमध्ये पोलिसांच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
उल्हासनगरमध्ये पोलिसांच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

उल्हासनगर येथे दोन पोलिसांच्या छळाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्य....

अधिक वाचा

पुढे  

शारिरीक व मानसिक त्रासाला कंटाळून गरोदर विवाहितेची आत्महत्या
शारिरीक व मानसिक त्रासाला कंटाळून गरोदर विवाहितेची आत्महत्या

वैष्णवी सिटी हांडेवाडे रस्ता देवाची उरुळी येथे सासु-सासरे आणि नवरा यांच्या....

Read more